HomeBreaking Newsपूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प टेकामांडवा शाळेतील नऊ विद्यार्थी पात्र

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प टेकामांडवा शाळेतील नऊ विद्यार्थी पात्र

जिवती (ता.प्र.) : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा टेकामांडवा पंचायत समिती जिवती या शाळेतील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नऊ विद्यार्थी पात्र झालेले आहेत. जिल्हा परिषद टेकामांडवा ही शाळा विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे नेहमीच चर्चेत असते.यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण बारा पैकी नऊ विद्यार्थी पात्र झालेले आहेत.

गणेश हाके,राजवीर खरात, शिवकण्या एलडे,अंजली यमगिर, तनुजा मुंगरे, शिवानी हाके,समर्थ लिंगनवाड, सृष्टी फुलेवाड, सुहानी होळगीर, या सर्व पात्र विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। श्री दीपक गोतावळे , रुपेश मांदाळे यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल शाळेतील इतर शिक्षक वृंद लच्चू पवार,किसन बावणे, मुखळा मलेलवार ,उषा डोये,जयश्री घोळवे,पायल कुकडे,दीक्षा कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती व सर्व पालक वृंद , केंद्रप्रमुख रामटेके,गटशिक्षणाधिकारी धनराज आवारी यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!