Homeचंद्रपूरगोंडपिंपरीभूषण फुसेंनी दिला त्या कुटुंबियांना मदतीचा हाथ...

भूषण फुसेंनी दिला त्या कुटुंबियांना मदतीचा हाथ…

गोंडपिपरी

दिवसभर मजुरी करून बाजारात जाण्याकरिता पायदळ निघालेल्या साईनाथ सुरकर यांना एका बाईकने मागून धडक दिली.झालेल्या अपघातानंतर जखमी साईनाथला भंगाराम तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. पण यावेळी डॉक्टरच उपस्थित नव्हते. अनेक वेळपर्यंत वेदनेने कण्हत असलेल्या साईनाथला शेवटी गोंडपिपरी च्या ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

प्रशासकीय अनास्थेने एका निष्पाप शेतमजूरचा बळी गेला. हा मुद्दा समोर आला.अनं यानंतर समाजमनात संताप पेटला. अतिशय गरीब कुटूंबातील कर्त्या पुरुषाच्या निधनाने कुटुंबियांवर आभाळ कोसळले. साईनाथ ला अथर्व व अनमोल अशी दोन लहानशी मुल आहेत. या आपल्या मुलांचं कस होणार या चिंतेने पत्नी वैशाली आसवांच्या गर्गेत बुडाली.एका गरीब कुटुंबावर आलेलं संकट, त्यांची झालेली वाताहात समोर आली.

दरम्यान सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी साईनाथ सुरकर यांच्या भंगारपेठ येथील घरी जात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. कुठलीही अडचण असली तरी सांगा आपण मदतीसाठी तत्पर असू अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर त्यांनी वैशाली सुरकर व त्यांच्या दोन्ही मुलांना आर्थिक मदत दिली.
दरम्यान काहीही चूक नसतांना एका शेतमजूराचा बळी गेला. उपचाराअभावी हा प्रकार घडल्याने दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!