आयशर ट्रकसह 15 लाखांची अवैध देशी दारु जप्त

0
451

गडचिरोली प्रतिनिधी/नितेश खडसे

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज संध्याकाळी गडचिरोलीहून चंद्रपूर जिल्ह्यात जाणाऱ्या एका ट्रकसह 15 लाख रुपयांची दारु जप्त केली आहे. याप्रकरणी चालकालह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आज संध्याकाळी एम.एच.34 – एव्ही 1792 क्रमांकाच्या आयशर कंपनीच्या मिनी ट्रकमधून अवैधरित्या दारुची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक एन.एस.धुरड यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी नवेगाव येथील पेट्रोलपंपाजवळ सापळा रचून ट्रक अडविला. ट्रकची पाहणी केली असता मागच्या भागात काहीच नव्हते. मात्र, आत खोलीसारखा एक चोर कप्पा तयार केल्याचे दिसून आले. त्याची तपासणी केली असता तेथे रॉकेट संत्रा कंपनीच्या देशी दारुच्या 110 पेट्या आढळून आल्या. या सर्व पेट्या आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे. एका पेटीत 90 मिलीलीटरच्या 100 बाटल्या असून, दारुची एकूण किंमत 4 लाख 40 हजार आणि ट्रकची किंमत 10 लाख 60 हजार असा एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिवाय देसाईगंज येथील वाहनचालक विनोद कोडापे, अमोल गुंडूरवार व डोमेश्वर डुंबरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. या कारवाईत रात्रि ऊशिरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर अवैध दारुचा व्यवसाय गोंदिया जिल्ह्यातील काही देशी दारूच्या ठेक्यांवरून सुरू आहे. याचा खरा सुत्रधार शोधून काढण्याचे आव्हान राज्य ऊत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांसमोर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here