जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला “उमेद” चा मूक मोर्चा

0
338

जिल्हाभरातील हजारो महिलेचा सहभाग

गडचिरोली जिल्हा संपादक / प्रशांत शाहा

हजारो उमेद महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा खाजगीकरण रद्द करण्याची मागणी ,शहरातील वाहतुक विस्कळीत राज्य सरकार कडून महाराष्ट्र राज्य जीवनोंन्नती अभियानाला खाजगीकरन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आज गडचिरोली जिल्ह्यातील हजारो उमेद महिला गडचिरोली येथे एकत्रित येउन वंचित वहुजन आघाडी, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि आयटकच्या नेतृत्वात गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला या विशाल मोर्चात जिल्ह्याच्या विविध भागातून हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या त्यामुळे गडचिरोलीच्या मुख्य मार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती महाराष्ट्र राज्य जीवनोंन्नती अभियानाला खाजगीकरन रद्द करा, उमेद कर्मचार्यांचे वार्षिक करार नुतनीकरण करा, सेवेतून काढलेल्या कर्मचार्याना पुन्हा सेवेत समविष्ठ करा इत्यादि मागन्याचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फ़त सरकारला देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here