उमेद अभियानाच्या तीस हजार महिलांचा विशाल मुक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला 

696

सरकारचा जाहीर निषेध मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहन आंदोलनाचा इशारा

चंद्रपूर/ रवि रायपुरे (कार्यकारी संपादक)

महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान होय. आता हे संपूर्ण अभियान बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने अभियानाला जोडलेल्या 50 हजार महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग खडतर झाला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्यातील दहा लाख महिलांनी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी म्हणजेच 12 ऑक्टोबर 2020 रोजी सोमवारला मूक मोर्चा काढून शासनाला जाब विचारला आहे

गट,ग्राम संघ व प्रभाग संघांना दिल्या जाणारा निधी वितरित करावे, बाह्य संस्थेचा हस्तक्षेप थांबवावा, कॅडरचे मानधन त्वरित वितरित करावे,ज्या समूहाला भांडवल मिळाले नाही त्यांना निधी द्यावा, अभीयांनातिल कर्मचाऱ्यांच्या सेवा अविरत सुरू ठेवण्यात याव्या, उमेद कर्मचाऱ्याचे वार्षिक करार नूतनीकरण करावे, या मागण्या ला घेऊन जिल्ह्यातील तीस हजार महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे विशाल मुक मोर्चाचे प्रदर्शन घडविले.

कोणतेही राजकीय पाठबळ न घेता स्वतः महिला रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. या आंदोलनाने सरकारला जाग आली नाही तर, राज्यभर पुढील काही दिवसात महिला स्वतःच्या हक्कासाठी आत्मदहन आंदोलन करतील. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली.