परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शासनाने तातडीने द्यावी ; आमदार डॉ देवरावजी होळी

0
180

अतिवृष्टी व वादळ वाऱ्या मुळे शेतातील उभे पीक नष्ट झाले

गडचिरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शासनाने तातडीने द्यावी अशी मागणी आमदार डॉ देवरावजी होळी यांनी शासनाला पत्राद्वारे केली आहे

मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात सातत्याने परतीच्या पावसाचा तडाखा सुरू असून ऐन कापणीत आलेले उभे पीक या अती पावसामुळे व वादळ वाऱ्या मुळे पूर्णतः नष्ट झाले आहे त्यामुळे शासनाने तातडीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करावे व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना उध्दव जी ठाकरे , राज्या चे विरोधी पक्षनेता मा.देवेन्द्रजी फडणवीस कृषी मंत्री ना.बाळासाहेब थोरात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. प्रवीण जी दरेकर व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here