पत्रकार परिषदेत प्रशांत येल्लेवार यांची माहिती
गोंडपिपरी(सुरज माडुरवार)
शहराच्या आसपासचा परिसर गावठण जागेनी व्यापला आहे.मध्यभागी गोंडपिपरी गाव वसल्यामुळे नाईलाजास्तव शहरातील बऱ्याच लोकांनी गावठण जागेवर अतिक्रमण केल्याचा प्रकार दिसून येत आहे.सदर जागेवर अनेक वर्षांपासून त्यांनी अतिक्रमण करून घरे बांधली.परंतु अजूनपर्यंत प्रशासनाने नागरिकांच्या या बांधकामाला नियमित केले नाही.हा प्रकार मागील ५२ वर्षांपासून प्रलंबित आहे.शहरातील राममंदिर वार्डातदेखील तेथील नागरिकांचा हा प्रश्न आहे.सदर प्रकरणाची उकल करण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चाचे तालुका महामंत्री प्रशांत येल्लेवार ३१-०८-२०२० ला पुढाकार घेऊन आमरण उपोषणाचे बंड पुकारले.व यश देखील आले.नगरपंचायत च्या आश्वासना नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.परंतु तब्बल २ महिने लोटून सुद्धा पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल लाभार्थी यांची मोजणीची रक्कम न भरल्याने पुन्हा प्रशांत येल्लेवार यांनी २० ऑक्टोबर पासून आमरण उपोषन करत असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून दिली आहे.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे,नगरसेवक राकेश पुन,भाजपा ओबीसी सेल तालुका अध्यक्ष निलेश पुलगमकर,तालुका उपाध्यक्ष सुनील फुकट,गणपतराव चौधरी उपस्थित होते.

सध्यास्थितीत कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे पाणी कर,घर टॅक्स वसुली ठप्प आहे.नागरिकांच्या हाताला काम नाही अशात वसुली थांबली आहे.त्यामुळे सामान्य फंड मध्ये तितकी रक्कम शिल्लक नाही.व म्हाडाकडून अजूनही मोजणीचे पैसे आले नाही परंतु नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा करिता आम्ही सकारात्मक आहो.
नगराध्यक्षा सपना साखलवार ; नगर पंचायत गोंडपिपरी
सामान्य फंडात जेव्हा पैसे होते तेव्हा नगरपंचायत ने भुमिअभिलेख कार्यालयात मोजणीची रक्कम जमा केली नाही.अशावेळी जागेच्या मोजणीचा अहवाल प्रशासनाकडे अजूनपर्यंत सादर न झाल्यामुळे शहरातील शेकडो नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ घेणे कठीण झाले आहे.गरिबांना घरकुलाचा लाभ घेता यावा करिता भाजपच्या वतीने २० पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
-प्रशांत येल्लेवार.






