Homeगडचिरोलीअवैध रेतीचा भरलेला ट्रैक्टर कोतवालाच्या समोरून पळविला ; 4 तस्करांवर गुन्हा दाखल

अवैध रेतीचा भरलेला ट्रैक्टर कोतवालाच्या समोरून पळविला ; 4 तस्करांवर गुन्हा दाखल

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी / नितेश खडसे

ट्रैक्टरमधून रेतीची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला अटकाव करून ट्रॅक्टर मालकावर कारवाई केली. मात्र ट्रॅक्टर मालकाने कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालुन ट्रॅक्टर पळविल्याची घटना आज 11 ऑक्टोंबर रोजी पहाटे 4 ते 4.15 वाजताच्या
सुमारास धानोरा येथे घडली. यामुळे निवासी नायब तहसीलदारांनी धानोरा पोलिसात तक्रार दाखल केली असुन पोलीसांनी याप्रकरणातकोतवालाच्या बयानावरून  4 आरोपींवर कलम 379,186,34 व 48अंतर्गत गुुुुुुन्हा दाखल केला असुन पोलीस ऊपनिरीक्षक सुरेश साळूंके आरोपींचा शोध घेत आहेत. धानोरा तालुक्यात मागिल कित्येक महिण्ययांपासुन रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असुन तस्करांची प्रचंड मुजोरी वाढली असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या सर्व प्रकरणात धानोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद झालेले आहेत.
प्राप्त माहितीनुसार धानोरा-मुरूमगांव मार्गावरील डॉ. बर्वे  यांच्या घरासमोरील मुख्य रस्त्यावर एम.एच. 33एफ 2256 या क्रमांकाच्या ट्रैक्टरने रेतीची तस्करी केली जात असल्याचे आढळून आल्यानंतर महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ट्रैक्टरला अटकाव केला. यानंतर वाहन मालक गणेश मुपतवार घटनास्थळी पोहोचला. त्याने वाहन चालकाला खाली उतरविले.आपण ट्रैक्टरवर बसुन कोतवाल मारोती पदा व नरेश हारामी यांच्यासोबत वाद घालून ट्रैक्टरसह पळ काढला. यामुळे प्रभारी तहसीलदारांच्या मार्गदर्शनात निवासी नायब तहसीलदार भगत यांंनी धानोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलीसांनी घटनास्थळावर ऊपस्थित असलेल्या कोतवालाचेे बयान नोंदवून त्या आधारे ट्रैक्टर मालक गणेश मुपतवार यांचेसह चालक व अन्य 2 इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान  महसुल विभागाने किसान भवनाच्या मुख्य गेटजवळ अवैधरित्या आढळून आलेली 3 ब्रॉस रेती जप्त केली. ही कारवाई प्रभारी तहसीलदार महेंद्र गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार भगत, मंडळ अधिकारी ललीत झाडे, तलाठी अविनाश गेडाम, कोतवाल मारोती पदा, नरेश हारामी यांनी केली….

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!