मूलचेरा तालुक्यातील येल्ला परिसरात बतकामा उत्सव साजरा

433

 

गडचिरोली जिल्हा संपादक / प्रशांत शाहा

गौरी देवी
मानल्या जाणाऱ्या बतकामा देवी उत्सवाचा आरंभ पितृ मोक्ष अमावस्या पासून सुरू झाला असून मूलचेरा तालुक्यासह इतर खेडे गावातही या उत्सवाची सुरुवात झाली असून या नऊ दिवसही विविध कार्यक्रम पार पाळली जात आहेत बतकामा उत्सव गडचिरोली जिल्याचा दक्षिण भागातील येल्ला इथे बतकामा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो येल्ला येथील बहुतांश लोक तेलगू भाषेत असल्यानं तेलंगणा राज्यातील हा उत्सव या परिसरात मोठ्या उत्सवन साजरा करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू झाली आहे आणि ही परंपरा आजही सुरू आहे विविध प्रकारची रंगीबेरंगी फुलांनी तयार केलेल्या बतकामा गौरी देवीचा प्रतीक मानला जातो नवरात्रीचा पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांनी बतकामा तयार करतात आणि रोज सायंकाळी प्रत्येक वार्डातील महिला एकत्र येऊन तेलगू गीत गाऊन बतकामा सभोवतालच्या नाचत फिरून खेळतात मोठया उत्सवात हा सण साजरा होतो शेवटच्या नवव्या दिवशी सदुल बतकामा म्हणून सायंकाळाला जास्तीत जास्त रंगीबेरंगी फुलांची मोठ्यात मोठी बतकामा तयार करण्याची जड ओळ महिलांमद्ये असते बतकामा एका ठिकाणी ठेऊन महिला एकत्र येऊन तेलगू गीते म्हणतात त्यानंतर ढोल ताशा यांचा तालावर बतकामा डोक्यावर घेऊन प्राणहिता नदीवर जाऊन विसर्जन करतात