Homeचंद्रपूरगोंडपिंपरीगोंडपिपरी येथे वाढीव पाणी पुरवठा कामाचे आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते भूमिपूजन

गोंडपिपरी येथे वाढीव पाणी पुरवठा कामाचे आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते भूमिपूजन

शहरातील प्रत्येक नागरिकांना मिळणार दररोज ४० ऐवजी ७० लिटर पाणी

गोंडपिपरी / शेखर बोनगिरवार

शहरात विविध योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे विकास कामे होत असून यात आणखी एक विकास कामाची भर पडणार आहे. येणाऱ्या काही दिवसातच शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या यापाणीप्रश्न समस्या सुटणार असून लवकरच वाढीव पाणीपुरवठा अंतर्गत प्रत्येक नागरिकाला आता 40 लिटर ऐवजी 70 लिटर पाणी मिळणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या वाढीव पाणीपुरवठा कामाचे भूमिपूजन राजुरा विधानसभा क्षेत्र आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.
आयोजित भूमिपूजन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्ष सपना साखलवार, जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता घोनमोडे, उप अभियंता पाटील, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी ,गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तुकाराम झाडे, काँग्रेसचे ज्येष्ठ राजीव सिं ह चंदेल, कृउबा उपसभापती अशोक रेचनकर, देविदास सातपुते ,नामदेव सांगळे, शंभू जी येलेकर, देवेंद्र बट्टे , श्रीनिवास कंदनुरीवर, विनोद नागापुरे ,बालाजी चनकापुरे, संतोष बंडवार, नगरसेविका लता हुलके, कुळमेथे, प्रदीप झाडे ,पाणीपुरवठा सभापती चेतन सिंह गौर, नगरसेवक राकेश पुन, बबलू कुळमेथे, काँग्रेस महिला आघाडीच्या शीला बांगरे ,वनिता वाघाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक शिवाजी चौक येथे पार पडलेल्या भूमिपूजन सोहळा आठवण नगरपंचायत कार्यालयात वाढीव पाणीपुरवठा कामात च्या भूमी पूजनानंतर चे नागरिकांना मिळणारे लाभ हे विस्तृत रित्या समजून सांगण्यात आले. याप्रसंगी बोलताना क्षेत्र आमदार सुभाष धोटे म्हणाले की, देशातील कुठलेही गाव असो शासन त्याचा विकासात्मक दृष्ट्या विचार करून विविध योजनांमार्फत त्या गावाचा विकास साधण्यास प्रयत्नशील असतो. अगोदर ग्रामपंचायत असलेल्या गोंडपिप्री येथे ये नगरपंचायत स्थापनेपासून विविध योजनेमार्फत शासनस्तरावरून विकास कमी केल्या गेली.अगोदर नागरिकांना ग्रामपंचायत स्तरावरून प्रत्येक नागरिक 40 लिटर असे पाणी वाटप प्रमाण होते. मात्र ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत होताच आता प्रत्येक नागरिकांच्या वाट्याला सत्तर लिटर प्रति व्यक्ती शुद्ध पेयजल असे आगामी काळात वाटप होणार असून 840 घरांची वस्ती असलेल्या गोंडपिपरी शहरात प्रत्येक घराला नळ योजनेद्वारे जोडण्यात येणार आहे. विरोधकांनी विकास निधी मंजुरी वरून फलकबाजी चे राजकारण न करता विकास निधी येणारच हा शासनाचा उदात्त हेतू आहे व प्रत्येक नागरिकांची मूलभूत गरजांची पूर्तता करणे हे शासनाचे आद्य कर्तव्य आहे असे म्हणत आ. धोटे यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला. याप्रसंगी नगरपंचायत कर्मचारी नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!