Homeगडचिरोली"माझे कुटुंब,माझी जबाबदारी" मोहिमेचा शहरात शुभारंभ

“माझे कुटुंब,माझी जबाबदारी” मोहिमेचा शहरात शुभारंभ

Advertisements

गडचीरोली जिल्हा प्रतिनिधी नितेश खडसे

Advertisements

गडचिरोली शहरात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने “माझे कुटुंब,माझी जबाबदारी” ही मोहीम सुरु केली आहे, या मोहिमे अंतर्गत आशा वर्कर, आरोग्य सेवक व स्थानिक स्वयंसेवक अशी टीम शहरातील प्रत्येक वॉर्डात घरोघरी जाऊन घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि को-मॉर्बिड रुग्णांची माहिती घेतील जात आहे तसेच ताप, खोकला, दम लागणे ऑक्सिजन ची कमी अशी कोविड सदृश्य लक्षणे असणा-या नागरिकांना कोविड तपासणी केंद्रात पाठविले जात आहे. साळवे नर्सिंग स्कुल, चातगाव यांनी या मोहिमेत स्वच्छेने योगदान देण्याची तयारी दर्शविली असून दिनांक ०२/१०/२०२० रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती ला मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. प्रशिक्षित ३० स्वयंसेवकांना थर्मल स्कॅनर व ओक्सिपल्स देवून शहरात सर्वेक्षणा करिता पाठविण्यात आले. रामपुरी न.प. शाळेत पार पडलेल्या कार्यक्रमात नगर परिषदेच्या नगराध्यक्षा योगित पिपरे, संजीव ओहोळ मुख्याधिकारी,डॉ. सुनील मडावी, डॉ. विनोद बिटपल्लीवार, डॉ.गेडाम, सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी ताकसांडे, चंद्रशेखर भडांगे, सुशांत रच्चावार न.प. चे शिक्षण विभाग प्रमुख बंडू ताकसांडे, सिटी को-ओर्डीनेटवर तृप्ती मल व गणेश नाईक व इतर नगर परिषद व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!