उद्यापासून अहेरी सलग हप्ताभर कडकडीत बंद जनता कर्फूचे आव्हान

0
351

 

गडचिरोली प्रतिनिधी/सतिश कुसराम.

कोरोंनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्यात अनेक ठिकाणी तालुका स्तरावर बंद फुकरण्याचे आव्हान वेगवेगळ्या व्यापारी संघटनांनी घेतल्याने उत्कृष्ट सहभाग नोंद झाल्याची सकारात्मक बाब घडत असल्याने प्रशासनाला सुद्धा थेट जनतेचा सहभाग दिसून येत आहे.अहेरी शहर व परिसरात सद्या कोरोना चा वाढता संक्रमण काळात या पाश्वभूमीवर हा निर्णय आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोविड-१९ची साखळी तोडण्यास निश्चितच उपयोगात येईल.अहेरी व सिरोंचा भागात कोरोनाचा वाढता प्रभाव दिवसेंदिवस अधिकच आक्रमक होत असल्या कारणाने अहेरी शहरात सोमवार ते रविवार पर्यत 7 दिवसांचा जनता कर्फ्यु (कडकडीत बंद) ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय काल स्थानीक विठ्ठल रुक्मिणी मंदिरा तील बैठकीत व्यापारी संघटना,अहेरी तथा विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी एकमताने सकारात्मक निर्णय घेतला आहे.ह्या दिवसांत पूर्ण एक आठवडा जनता कर्फु असल्याने सर्व व्यापार कडकडीत बंद राहतील, ह्या बंद मध्ये केवळ रुग्णालय, मेडिकल, कृषी केंद्र, दूध आणि वर्तमानपत्र वितरण अशा महत्वपूर्ण व केवल जिवणावश्यक वस्तुंची खरेदी विक्री सुरू राहील, ह्याशिवाय किराणा दुकाना सहित इतर सर्व प्रकारचे दुकाने, भाजीपाला, हॉटेल, चहा दुकाने, पान ठेले हे पुढील 7 दिवस अहेरी परीसरात बंद राहील.अहेरी शहरातील कोणत्याही नागरिकांना गैरसोय होहू नये मन्हून शनिवार व रविवार हे दुकान चालू राहणार असल्याने त्यांनी पुढील 7 दिवस पुरेल इतकी खरेदी करून आपली गैरसोय टाळावी असे आवाहन व्यापारी संघटना, अहेरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here