माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेला सहकार्य करा

0
217

नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे प्रतिपादन

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून ‘माझे कुटुंब- माझी जबबादारी’ मोहिम संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविली जात आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली शहरातही ही मोहिम राबविली जात असून या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी केले.

जाहीरात

नगर परिषद गडचिरोली येथे आज २२ सप्टेंबर रोजी माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. मडावी, प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक प्रमोद पिपरे, डॉ. गेडाम, सभापती वैष्णवी नैताम, लता लाटकर, निता उंदिरवाडे, मुख्याधिकारी संजीव ओहोळ, तालुका आरोग्य सहायक हरिदास कोटरंगे यांच्यासह सर्व नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.

माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम शहरात १५ दिवस राबविण्यात येत आहे. यासाठी ३० पथके तयार करण्यात आले असून एका पथकात ३ व्यक्ती राहणार आहेत. या मोहिमेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रत्यक्ष भेट देवून प्रत्येक व्यक्तीचा थर्मामीटरने ताप मोजण्यात येणार आहे. तसेच ऑक्सीमिटरने शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण मोजण्यात येणार असून ज्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण ९५ सेल्सीयसपेक्षा कमी असल्यास त्यास संदर्भ सेवा देवून कोविडची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here