मास्क न वापरणे व सार्वजनिक ठिकाणी थुंकने पडणार महागात

1154

 

चामोर्शी/प्रतिनिधी गौरव वाट

कोरोणा चे वाढते संक्रमण टाळण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात मास्क न लावता फिरणार यांवर व उघड्यावर थुंकणाऱ्या २१० जणांवर प्रशासनाने कारवाई केली आहे.
थुंकी मार्फत सुद्धा कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी जनजागृती करीत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर प्रतिबंध लावले आहेत.जिल्ह्यातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत.मास न लावता कोणीही घराबाहेर पडू नये, उघड्यावर थुंकू नये, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये, असे आवाहन विविध माध्यमातून करीत जनजागृती केल्या जात आहे. तरीसुद्धा नियमांचे उल्लंघन केले जात आहे.त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी नगरपंचायत, पोलिस विभाग व मुक्तीपथ अभियानाचे पथक गस्त घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहे. तसेच जनजागृती करीत मास्क लावण्याचे व सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याचे घेण्याचे आवाहन करीत आहेत.चामोर्शी शहरात नगरपंचायतीचे १२ कर्मचारी, ५ पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून मोहीम राबवली जात आहे.उघड्यावर थुंकतांना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून मास्क विना फिरताना दिसताना दंडात्मक कारवाई केली जात आहे.आतापर्यंत २१० जणांवर कारवाई करण्यात आली असून २४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.