सेवा सप्ताह निमित्त गडचिरोली नगर परिषद येथे वृक्षारोपण

1016

 

गडचीरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून त्या निमित्याने गडचिरोली नगर परिषदेच्या परिसरात आमदार डॉ. आमदार डॉ. देवराव होळी यांच्या शुभ हस्ते नगर परिषद अध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी प्रत्येकाने किमान एक झाड लावावे असे आवाहन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केले.
यावेळी उपस्थित जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, किसान आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रमेशजी भुरसे, नगरसेवक प्रशांत खोबरागडे, नगरसेविका वैष्णवी नैताम, लताताई लाटकर, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा महामंत्री जनार्दनजी साखरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष दुर्गाताई काटवे, भाजपा ज्येष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, शहर महामंत्री विनोद देवोजवार, देवाजी लाटकर, राजू शेरकी,यांचेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.