गडचिरोली जिल्हा प्रशासनातर्फे उत्तरे तुमच्या प्रश्‍नांची – वेब सिरीज सुरू

0
179

 

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

गडचिरोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या संकल्पनेतून सामान्य लोकांच्या मनातील प्रश्न किंवा एखाद्या विषयाशी संबंधित असलेल्या अडचणी यावर विविध विभागातील प्रमुखांशी संवाद साधत एक वेब सिरीज निर्मिती करण्यात येत आहे.

यामुळे कोरोना बाबत किंवा त्या अनुषंगाने विविध विषय असतील याबाबत सविस्तर चर्चा वेगवेगळ्या संबंधित विषयाच्या प्रमुखाबरोबर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. याबाबतचे व्हिडिओ सर्व स्तरावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यात येणार आहे.त्या मालिकेतील पाहिलं एपिसोड 1 : माझे कुटुंब माझी जबाबदारी हा प्रदर्शित करण्यात आला त्यात मुलाखत घेतली: डॉ.शशिकांत शंभरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी.त्या वेबसिरिज ची खालील 👇प्रमाणे लिंक प्रसारित करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here