Home गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाचे परिक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर - उदय सामंत, मंत्री उच्च व...

गोंडवाना विद्यापीठाचे परिक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उदय सामंत, मंत्री उच्च व तंत्रशिक्षण

अंतिम परिक्षेच्या संदर्भातील आढावा बैठक

गडचीरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

गोंडवाना विद्यापीठाने अंतिम परिक्षेबाबत तयार केलेले मॉडेल माझ्या मते राज्यात अग्रस्थानावर आहे असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. ते आज गडचिरोली येथे अंतिम परिक्षेच्या संदर्भात बैठक घेण्यासाठी येथे आले होते. विद्यापीठाकडून परिक्षेसंबंधी झालेली तयारी, अडचणी तसेच इतर अनुषंगिक विषयावर मंत्र्यांनी बैठकीचे आयोजन जिल्ह्यात केले होते. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ऑनलाईन परिक्षेबाबत तसेच ऑफलाईन (प्रत्यक्ष) परिक्षेबाबत तयार केलेले मॉडेलची पाहणी केली. यामध्ये परिक्षा पद्धतीची निवड, अडचणी आल्यास पून्हा परिक्षा तसेच अनुउर्त्तीण विद्यार्थ्यांबाबत पून्हा संधी यातील नियोजन चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, संचालक परिक्षा व मुल्यमापन डॉ. अनिल चिताडे, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, सहायक जिल्हाधिकारी आशिष ऐरेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील 17229 विद्यार्थी अंतिम परिक्षा देणार असून यामध्ये चालु वर्षीचे 15153 विद्यार्थी मागील वर्षी विषय राहिलेले 2013 विद्यार्थी तर बहिस्थ 63 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मंत्री उदय सामंत म्हणाले की विद्यार्थ्यांना घरातूनच परिक्षा द्यावी असे प्राधान्य देण्यात आले होते. यानूसार 17229 पैकी 90 टक्के विद्यार्थी घरातूनच ऑनलाईन परिक्षा देण्यासंदर्भात तयार झाले आहेत. तर 706 विद्यार्थी तांत्रिक अडचणीमुळे तसेच स्वत: निर्णय घेवून प्रत्यक्ष परिक्षा देणार आहेत. प्रत्यक्ष (ऑफलाईन) परिक्षा देणारे 706 विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी अडचणी निर्माण होवू नयेत म्हणून जिल्हाधिकारी यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत.

परिक्षा असेल या प्रकारे

अंतिम परिक्षेआधी किमान 5 वेळा मॉक टेक्स्ट/चाचणी विद्यार्थ्यांची घेण्यात येणार आहे. यातून त्यांना परिक्षेसंबंधी प्रक्रिया लक्षात येईल. तसचे प्रत्येक अभ्यासक्रमाचा प्रश्न संच (Question Bank) ही वाटप करण्यात येणार आहे. अंतिम परिक्षेचा निकाल घोषित करतांना 50 टक्के परिक्षेचे गुण ग्राहय धरणार आहेत. तर 50 टक्के इन्टरर्नलचे गुण ग्राहय धरणार आहेत. ऑनलाईन परिक्षेमध्ये ऐनवेळी तांत्रिक अडचणी आल्यास विद्यार्थ्यांना 15 दिवसांनी पून्हा संधी देण्यात येणार आहे. अनुर्तीण विद्यार्थ्यांनाही पून्हा तातडीने परिक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. जेणेकरुन त्यांचे वर्ष वाया जाणार नाही.

विद्यापीठात डेटा सेंटर

विद्यापीठातील आवश्यक डेटा सेंटर तयार करणेबाबत वारंवार मागणी होती. त्याबाबत आम्ही तातडीने प्रशासकीय मंजूरी दिली आहे. यासाठी 2.45 कोटी देण्यात आले आहेत. सद्या या डेटा सेंटरचे काम सुरु झाले असून येत्या महिना अखेर पूर्ण होईल असे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

विद्यापीठांच्या जागा खरेदीबाबत प्रश्नांवर चर्चा

विद्यापीठाच्या जागेच्या प्रश्नासह इतर भौतिक सुविधांचे प्रश्नही मार्गी लावण्यात येणार आहेत, असे मंत्री महोदयांनी सांगितले. परिक्षा केंद्र, प्रशासकीय इमारत यासाठी आवश्यक निधीही दिली जात आहे. 35 एकर जागेची खरेदी झाली असून अजून 15 एकर जागा खरेदी करण्यात येणार आहे. टप्पा 1 मधील विद्यापीठाच्या जमिन खरेदी करिताचे 79 कोटी शिल्लक असून सदर निधी विद्यापीठाच्या भौतिक संसाधन विकासासाठी वापरण्यात यावे असे सरकारतर्फे आश्वासन मिळाले आहे. मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन पुढील टप्पा-2 चे ही नियोजन मार्गी लागत आहे. यासाठी केंद्र स्तरावरुन निधी मिळविण्यासाठी केंद्र मंत्री नितीनजी गडकरी यांच्यामार्फत पाठपुरावा सुरु आहे असे ते म्हणाले.

50 एकरातील वेगळया व आधुनिक पद्धतीने काम करुन एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहे. टप्पा-1 व 2 चे पूर्ण काम झाल्यावर नक्कीच विद्यापीठ पाहण्यासाठी मुंबई किंवा परदेशातील लोक येतील.

आदिवासी व वन संशोधनावर आधारीत विद्यापीठ

आदिवासी अध्यासन, संशोधन व सशक्तीकरण असा विशेष जनाधार विद्यापीठाच्या व्हिजन व मिशन मध्ये अंतर्भुत करण्यात यावा. विद्यापीठ परिक्षेत्रातील अधिकतर भौगोलिक भुभाग वनसंपत्तीने व्यापलेला असल्यामुळे स्थानिक युवक व नागरिकांकरीता वनआधारित प्रशिक्षण, शिक्षण, संशोधन व उद्योजकता इत्यादी बाबतीत सहाय्यता प्रदान करण्याकरीता गोंडवाना विद्यापीठाचा केंन्द्रीयभुत विकास करणे.

*सह संचालक केंद्र सुरु होणार* : गडचिरोली व चंद्रपूर मधील शिक्षक, अधिकारी यांना वारंवार विद्यापीठात कामकाजासाठी नागपूर येथे जावे लागते. आता गोंडवाना विद्यापीठ भागातच सह संचालक केंद्र सुरु करण्यात येणार आहे. यासाठी 2 अधिकारी, विद्यापीठाचे 2 सदस्य व शासकीय इंजिनिअरींग कॉलेजचे 2 सदस्य यांची नेमणूक त्यासाठी करण्यात येणार आहे. तसेच सह संचालक यांना 15 दिवसातून एकदा विद्यापीठात राहणे बंधनकारक केले जाणार आहे. यातून लोकांचे प्रश्न तातडीने सोडविले जाणार आहेत.

मॉडेल कॉलेज

रातुम नागपूर विद्यापीठाचे मॉडेल कॉलेज गोंडवाना विद्यापीठास हस्तांतरित करण्याकरिता सरकारचे पूर्ण सहकार्य असणार.
विद्यार्थ्यांना संदेश : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना परिक्षेसंबंधी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले विद्यार्थ्यांसाठी परिक्षेसंबंधी सर्व बाबी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी येणारी परिक्षा आनंदी वातावरणात पार पाडावी. ऑनलाईन तसेच ऑफलाईन (प्रत्यक्ष) परिक्षा पर्यायामुळे विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाहीत.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

नक्षलवाद्याकडून वाहनांची जाळपोळ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यामधल्या हालेवारा पोलीस मदत केंद्रांतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी मवेली ते मोहुर्ली...

डॉ. अनिल रुडे लोकमत टाईम्स एक्सलेन्स इन हेल्थकेअर पुरस्काराने सन्मानित…

गडचिरोली/ चक्रधर मेश्राम: हृदयाशी जवळचे नातं असलेले गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत असलेले , अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत कार्यरत असलेले...

घोट-रेगडी रस्त्याचे नूतनीकरण सुरू आहे पण रुंदीकरणाचे काय? परिसरातील नागरिकांचा मोठा सवाल..

विदर्भ ब्युरोचीफ प्रशांत शाहा चामोर्शी: चामोर्शी तालुक्यातील घोट ते रेगडी व घोट ते चामोर्शी या रस्त्याची मागील काही वर्षांपासून खूब बिकट परिस्थिती झालेली होती. घोट...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विठ्ठलवाडा-आष्टी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे.. ए.जी कंन्ट्रक्शनच्या कामाची चौकशी करा-शिवसेनेची मागणी

गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यात सर्व बाजूने रस्त्याच्या बांधकामाचा धडाका सुरू आहे.अशातच तालुक्यातील विठ्ठलवाडा ते आष्टी मार्गाच्या रस्त्याचे अंदाजे ४५ कोटी रुपयांचे बांधकाम ए. जी...

101 सुरक्षा रक्षक सिएसटिपीएस मध्ये होणार पुर्ववत रुजु…आ. किशोर जोरगेवार यांनी घडवून आणली कामगार मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक…

चंद्रपुर: आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्याचा पाठपुरावा आणि प्रयत्नांनतर सिएसटीपीएस येथील नोंदणीकृत 101 सुरक्षा रक्षकांची नौकरीसाठी सुरु असलेली सहा वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे....

एसटी महामंडळ बसच्या धडकेत युवक ठार…गडचांदूर जवळील घटना…

राजुरा: राजुरा कोरपना आदिलाबाद जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 ब हा अपघात प्रवण महामार्ग झाला असून दोन दिवसांपूर्वी राजुरा येथील महिला प्राध्यापिका वनिता चिडे...

बेलतरोडी अग्नितांडवातील पीडितांना 15 ताडपत्री धम्मदान.. ‘द डिवाईन ग्रुप‘चा अभिनव उपक्रम

नागपूर : गेल्या आठवडयात बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सिलिंडरच्या विस्फोटातील भिषण आगीत शेकडो झोपडया भक्ष्यस्थानी झाल्याने हजारो नागरिक उघडयावर पडले. सोमवारी महाकारूणीक तथागत...

Recent Comments

Don`t copy text!