जिल्ह्यात  आज 200 कोरोना बाधिताची भर

0
264

 

चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या 6058 झाली आहे. यापैकी 3405 बाधित बरे झाले आहेत तर 2575 जण उपचार घेत आहेत.

सोमवारी एकूण 200 बाधित पुढे आले आहेत. मागील 24 तासात 7 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
ज्यामध्ये बालाजी मंदिर परिसरातील येथील 60 वर्षीय पुरुष, शंकरपूर, चिमूर येथील 55 वर्षीय पुरुष, बाबूपेठ येथील 65 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील 32 वर्षीय पुरुष व पाचवा मृत्यू वाघोली सावली येथील 55 वर्षीय बाधिताचा मृत्यू, सहावा मृत्यू बल्लारपूर येथील 65 वर्षीय पुरुष तर सातवा मृत्यू भिवापूर वार्ड चंद्रपूर येथील 68 वर्षीय पुरुष बाधितांचा झाला. काही मृतक बाधितांना कोरोनासह, उच्च रक्तदाब, मधुमेह व न्यूमोनियाचा आजार होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 71 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here