मशरूम, काटोल यासारख्या वनसंपदा पासून आदिवासींना रोजगाराची संधी

0
602
Advertisements

गडचीरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बेरोजगार,जंगलांनी व्यापलेला व मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या भामरागड, सिरोंचा,एटापल्ली
असे अनेक दुर्गम तालुके आहेत.
या दुर्गम तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. मात्र गडचिरोली जिल्ह्याला वनसंपदा मोठ्या प्रमाणावर लाभली आहे. जंगलांमध्ये विविध प्रकारच्या वृक्ष सोबतच टेकोङे, मशरूम यासारख्या भाज्या मिळत आहेत. याला जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणावर मागणी असते. दुर्गम भागातील महिला व पुरुष वर्ग आपला उदरनिर्वाह करण्या करीता जंगलात डुंबरावर निघत असलेले, टेकोडे(मशरूम),काटवल अशे विविध वस्तू घेऊन जंगलातीलच रस्त्या कडेला बसून विकत असल्याचे पहावयास मिळत आहे. या भाज्यांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांना चांगला रोजगार प्राप्त होत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना या भाजेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत.
काल अचानक इंडिया दस्तक न्युज ची टीम या परिसरात भेट दिली या वेळी रस्त्या कङेला अनेक महिला,पुरुष व छोटे छोटे मुलं पण टेकोटे विकत असल्याचे दिसून आले. वनसंपदा हीच धनसंपदा हे गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात यावरून दिसून येत आहे.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here