महिंद्रा होम फायनान्स ने गृह कर्जाची वसुली थांबवावी

0
321
Advertisements

 

कोरपना तालुक्यातील कर्ज धारक शेतकरी लाकडाऊन मुळे आर्थिक अडचणीत

रवि रायपुरे /कार्यकारी संपादक

Advertisements

महिंद्रा होम फायनान्स या कंपनीच्या जिल्हा मुख्यालय अंतर्गत संपूर्ण तालुक्यात होम लोन शाखा स्थापित असून कित्येक गरजूंना या मार्फत होम लोन वितरीत करण्यात आले आहे.इतर राष्ट्रीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना फक्त पीककर्ज व काहीसे व्यवसाय कर्ज दिले जाते परंतु गृहकर्ज देण्यास या बँका उदासीन असून मुद्दाम टाळाटाळ करीत असतात,त्यामुळे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतर खाजगी बँकांचा तसेच इतर कंपन्याचा सहारा घ्यावा लागतो.

मागील वर्षातील नैसर्गिक प्रकोपामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना आता सतत सुरू असलेल्या करोना लाकडाऊन मुळे तर शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे सध्या भयंकर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याचे होम लोनचे हप्ते थकीत होणे सहाजिकच आहे. परंतु कोरपना तालुक्यात महिंद्रा होम फायनान्स ने वितरीत केलेल्या गृहकर्जाचे हप्ते भरण्याचा तगादा सुरू केला असून,कित्येकांना वेठीस धरण्यास सुरू केले आहे.ही परिस्थिती फक्त कोरपना तालुक्या पुरती नसून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पाहायला मिळत आहे.

सध्याच्या परिस्थितीत कर्ज धारक शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने गृह कर्जाचे हफ्ते भरण्याची मुदत कंपनीने वाढवून द्यावी अशी कोरपना तालुक्यातील कर्ज धारक शेतकऱ्याचे म्हणणे आहे. जर कंपनी कडून कर्ज धारकांना मुदत वाढीची मुभा न देता कर्ज भरण्याचा सतत तगादा लावणे, वेठीस धरणे,वेळप्रसंगी अपमानित करणे असले प्रकार घडल्यास कोरपना तालुक्यातील समस्त कर्ज धारक शेतकऱ्यांकडून जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली जाईल असे बोलल्या जात आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here