कुरखेडा,कोरची तालुक्यात युरिया खताचा तुटवडा

708

 

गडचिरोली/कुरखेडा: प्रतिनिधी / रमेश कोरचा

कुरखेडा, कोरची या दोन्ही तालुक्यांमध्ये युरिया खताचा भीषण टंचाई असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
युरिया खताचा सरकारी किंमत 266 रुपय प्रति चुंगळी आहे. परंतु तुटवडा असल्यामुळे हेच चुंगळी ₹400ते450रूपयांनी बेलाकमध्ये विकत घ्यावा लागतो. यामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे.त्यातही हीच खत वेळेवर मिळत नसल्याने शेतक-यांच्या पिकांची नुकसान होत आहे.अशाप्रकारे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागत आहे.
विशेष बाब म्हणजे गडचिरोली जिल्यात खताची रॅक वडसा येथे लागत असते
आणि कुरखेडा,कोरची हे दोन्ही तालुका जवडचे असुनीही सुध्दा कसे काय खताचा तुटवडा हेच कुन्हा कळेना
तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कडे तातकाड लक्ष देऊन अश्या जादा दराने खताचे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाही करावी अशी मांगणी कुरखेडा,कोरची परिसरातील नागरिकांन कडून केले जात आहे