Home गडचिरोली दीना नदी वरील पूल कधी होणार….!अनेक गावकऱ्यांच सवाल?

दीना नदी वरील पूल कधी होणार….!अनेक गावकऱ्यांच सवाल?

1387

सध्या होतोय जीव घेणा प्रवास

गडचिरोली जिल्हा संपादक/प्रशांत शाहा

जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात असलेले एकमेव व सर्वात मोठे रेगडी येथील असलेल्या दीना धरणाचे नदी ही मूलचेरा तालुक्यातील देवदा ते रेगडी या रस्त्यावर असून ते देवदा या गावा जवळून वाहत असतो
महत्वाचे म्हणजे या मार्गावर बाराही महिने रहदारी असतो.
एटापल्ली,मूलचेरा व चामोर्शी या तिन्ही तालुक्याला जोडणारा जवळचा मार्ग असून एटापल्ली येथील सरकारी कर्मचारी तसेच अनेक गावातील नागरिक जिल्हा मुख्यालय गाठण्याकरिता याच मार्ग कमी अंतराचा असल्याने वापरत असतात
परंतु पावसाळ्यात अनेक जोखीम घेत आपले जीव धोक्यात घालून नागरिक दीना नदी पात्रातून जात असल्याचे दिसून येतो
अनेक नागरिकांचे या नदीतून वाहून गेल्याची घटना सुध्दा घडलेली आहे
यावर शासनाने त्वरीत दखल घेत दीना नदीवर पुलाची बांधकाम करावी अशी मांगणी देवदा,रेगडी,बोलेपल्ली,मूलचेरा गट्टा,गरंजी,वेंगणुर, सुरगाव,पडकोटोला,चंदनवेली,या परिसरातील नागरिकानकडून केली जात आहे

Don`t copy text!