गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग सुरू

0
512

गडचिरोली प्रतिनिधी/सतीश कुसराम

संपूर्ण जिल्हा महापुराच्या विळख्यात असताना जिल्यातील ग्रामीण तथा शहरी महामार्ग पूर्णपणे विस्कळीत झालेलं होतं,गेल्या तीन दिवसांपासून सर्व सामान्य जनता एका भीतीदायक घटनेचं साक्षीदार झालं होत.आज जिल्यातील शहरी महामार्ग तसेच ग्रामीण भागातील रस्ते सुरू झाल्याने अस्वस्थ नागरिकांना थोडासा विसावा आज झालेला दिसतो…सुरू झालेल्या रस्त्यापैकी गडचिरोली-नागपूर महामार्ग तथा अर्मोरी ते गडचिरोली विभाग राष्ट्रीय महामार्ग NH-353 C,(पाल नदी,गाढवीनदी खोब्रागडी नदी आणि कोलांडी नाला)रहदारीस आज मोकळा झालेलं आहे,सोबतच आरमोरी ब्रह्मपूरी विभाग (वैनगंगा नदी)
आरमोरी ते रामदा रस्ता (गाढवी नदी) संपूर्ण खूला झालेल आहे.
वडसा लाखांदूर रस्ता महा मार्ग (वैनगंगा नदी) उघडला
खरपुंडी दिभाना ते बोदली रस्ता, एमडीआर, -44 (कठानी नदी) उघडला.आरमोरी अंतरजी जोगिसाखरा रस्ता, व्हीआर (गढवी नदी) उघडलेला आहे तसेच वडसा बायपास रस्ता आणि मुरखला मुडजा वाकडी मेंढा रस्ता एस.एच.- ३७९ (पोटफोडी नदीजवळ) उघडला सोबतच गडचिरोली-चामोर्शि मार्ग आज मोकळा झालेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here