गोसीखुर्दचा फटका: गोंडपिपरी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

0
377

तातडीने पंचनामे करून मदत दया गोंडपिपरी यंग ब्रिगेड ची मागणी

गोंडपिपरी

गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने गोंडपिपरी तालुक्यातील वैनगंगा,अंधारी नदया ओसंडून वाहत आहेत.1994 नंतर पहिल्यांदाच आलेल्या महापूराने जवळपास विसहून अधिक गावातील हजारो हेक्टर श्ेातीचे पुर्णत नुकसान झाले आहे.गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी बांधवांवर आलेल भिषण संकट लक्षात घेता तातडीने पंचनामे करावे व मदत दयावी अशी मागणी गोंडपिपरी यंग बिग्रेड चे अध्यक्ष सुरज माडूरवार यांनी केली आहे.आज यासंदर्भात बिग्रेडच्या कार्यकत्र्यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन देत मागणी रेटून धरली.
संजय सरोवर मधून गोसीखुर्द धरणात पाणी सोडण्यात आले.धरणाची पातळी वाढल्याने तेथील पाणी वैनगंगेला सोडण्यात आले.यामुळ नदीला मोठा पूर आला.जिल्हयातील सावली,ब्रम्हपूरी तालुक्यातील अनेक गावांना व शेतपिकांना याचा मोठा फटका बसला.त्याचप्रमाणे गोंडपिपरी तालुक्यातील जवळपास विसहून अधिक गावातील शेतकरी बांधंवाचे पिक पाण्याखाली आले.व पुर्णपणे उध्वस्त झाले.गेल्या दोन महिन्यापासून प्रचंड मेहनत घेत,कर्जबाजारी होत शेतकरी बांधवांनी पिकांना जगविल.पण महापूराने सारच संपल.तालुक्यातील शेकडो श्ेातक-यांसमोर आता संकटाच आभाळ कोसळल आहे.अनेक शेतक-यंाची झोप उडाली आहे.खर तर हि परिस्थीती अतिशय गंभीर अशीच आहे.महापूराने दिलेल्या या वेदनांवर आपुलकीची व आर्थीक मदतीची थाप देणे आता आवश्यक झाले आहे.मागास व दुर्गम असलेला गोंडपिपरी तालुका शेतीवरच जिवन जगत आहे.अशावेळी अचानकपणे आलेल्या या संकटाने बळीराजा कमालीचा हादरला आहे.
हि गंभीर परिस्थीती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने श्ेातपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे.त्यांना एकरी विस हजार रूपयाची मदत करावी अशी मागणी गोंडपिपरी यंग ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सुरज माडूरवार यांनी केली आहे.याबाबत आज तहसिलदारामार्फत जिल्हयाधिका-यांना निवेदन पाठविण्यात आले.यावेळी सुरज माडूरवार यांच्यासह डाॅ.अशोक कुडे, निकेश बोरकुटे,उमेश उपासे गुरूदास अलोणे,नबात सोनटक्के,अक्षय बिटीवार,अक्षय भोयर,निखील आत्राम,प्रशांत शेडमाके यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here