Homeगडचिरोलीचामोर्शीत 43 गडचिरोलीत 16 कोरोना बाधितांसह आज जिल्यात 66 नवीन बाधित आज...

चामोर्शीत 43 गडचिरोलीत 16 कोरोना बाधितांसह आज जिल्यात 66 नवीन बाधित आज 12 जण कोरोनामुक्त

 

तालुका प्रतिनिधी चामोर्शि / सतीश कुसराम

जिल्ह्यात आत्तापर्यंत एकुण बाधित संख्या 1058 झाली

चामोर्शी शहरातील केवट मोहल्ला, किंभर मोहल्ला व मार्केट लाईनमधील 469 जणांची आज तपासणी केली त्यात 43 जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. तर गडचिरोली येथे आज 16 नवीन कोरोना बाधित यामध्ये 1 आरोग्य कर्मचारी व त्याच्या संपर्कातील अजून 1, चामोर्शी येथून आलेला 1, रामनगर येथील 4, सामान्य रूग्णालयतील 7 यामध्ये कनेरी येथील एक, शिवनी येथील 1, चणकाईनगर येथील रुग्णालयात दाखल असलेला 1 असे 16 जण, विसोरा वडसा येथील 1 एसआरपीएफ, धानोरा येथील KGBV शाळेतील 1 स्वयंपाकी, सिरोंचा येथील विलगीकरणातील 4 व कुरखेडा येथील 1 असे मिळून आज 66 नवीन बाधित मिळाले.

तसेच आज 12 जण कोरोनामूक्त झाले यात गडचिरोली येथील 1 स्थानिक व 3 पोलीस, आहेरी 4 जण यात एकजण कर्करोगाने ग्रस्त होता त्याने कोरोनवार मात केली. भामरागड येथील 2 पोलीस तर चामोर्शी मधील 2 स्थानिकांनी कोरोनावर मात केली.

यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची आकडेवारी 206 झाली. कोरोनामुक्त रूग्णांची संख्या 851 तर आत्तापर्यंत जिल्ह्यात एकुण बाधित संख्या 1058 झाली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!