गोसीखुर्द धरणाचे सात दरवाजे उघडले

382

गडचिरोली / सतीश कुसराम ( तालुका प्रतिनिधी)

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात मोठे धरण असणारे भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाचे सात दरवाजे प्रत्येकी एक मीटरने व उर्वरित 26 दरवाजे प्रत्येकी अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. या दरवाजातून 4597 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सूरू आहे. वैनगंगा नदीचे पात्र फुगले असून नदी काठावरील सर्व गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आव्हान जिल्हा पूर नियंत्रण कक्ष तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग गडचिरोली यांनी केले आहे.