एकीकडे नदीला पुर…दूसरीकडे गावात पाणी टंचाई

0
166

 

चेतन. कारेकर(आष्टी/चामोर्शी)

आष्टी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अधून मधून ठप्प पडत असल्याने भर पावसाळ्यात आष्टी सह परिसरात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे.
दुथळी भरून वाहत असणाऱ्या वैनगंगा नदी काठी वसलेल्या.चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला जोडणाऱ्या आष्टी गावातच अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने जनतेचे हाल होत आहे.आष्टीकरांवर पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली आहे.तर सार्वजनिक विहरिवर महिलांची तोबा गर्दी होते.भर पावसाळ्यात पाण्यासाठी पायपिट करावी लागत असल्याने जनतेकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.
या जोजनेत समाविष्ट असलेल्या काही गावात नैसर्गिक पाण्याचे स्रोत नसल्याने विहरितील गढूळ पाण्याने तहान भागवल्या जात आहे.क्षुल्लक कारणावरून आष्टी पाणीपुरवठा योजना अधून मधून ठप्प पडत असते.
सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातला असून कोरोनाचा संसर्ग असताना अशुद्ध पाण्याने तहान भागवत असताना जलजन्य रोगांना आमंत्रण आष्टीकर देत असून आरोग्य धोक्यात आले आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या कडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here