कोरोनाने एकाचा मृत्यू;दिवसभरात नवीन ४८ रुग्णांची भर

0
142

 

चंद्रपूर :

जिल्ह्यात २४ तासांत ४८ बाधित पुढे आले असून, बाधितांची संख्या १३५४ वर पोहोचली आहे. यापैकी सध्या ४४७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर, ८९३ बाधित बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. गणपती वॉर्ड बल्लारपूर येथील ७९ वर्षीय बाधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनाव्यतिरिक्त श्वसनाचा आजार व न्यूमोनिया होता.
बाधिताला २० ऑगस्टला दुपारी १२.३५ वाजता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. २१ ऑगस्टच्या रात्री एक वाजता अर्थात २२ ऑगस्टच्या पहाटे मृत्यू झाल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात जिल्ह्यातील १२, तर तेलंगाणा आणि बुलडाणा येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.
आज चंद्रपूर शहरात सर्वाधिक १९, बल्लारपूर ५, राजुरा, भद्रावती, वरोरा येथील प्रत्येकी दोन, कोरपना येथे ८, चिमूर, सिंदेवाही, जिवती, ब्रह्मपुरी, मूल येथे प्रत्येकी एक, गोंडपिपरी येथील ५ बाधित ठरले आहे असे एकूण ४८ बाधित पुढे आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here