गडचिरोली येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न…

388

शिवसेनेची आढावा बैठक संपन्न

प्रतिनिधी सतीश कुसराम:
पक्षांतर्गत मतभेद विसरून आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा : – मा.कोरेटे साहेब शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख यांचे शिवसैनिकांना निर्देश
मा.आशिषजी देसाई साहेब शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक आणि मा.माजी आमदार सहसरामजी कोरेटे साहेब शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख ( गडचिरोली- चिमुर क्षेत्र) यांचे प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथील फग्शन हाल मध्ये,दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोज मंगळवारला,मा.संदिपजी ठाकूर शिवसेना जिल्हा प्रमुख (गडचिरोली- आरमोरी विधानसभा क्षेत्र) आणि मा.पुंडलिकजी येवले सर शिवसेना जिल्हा प्रमुख (ओबीसी/व्हीजेएनटी) गडचिरोली जिल्हा यांनी शिवसेना आढावा बैठकीचे आयोजन केले होते.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था,नगर परिषद,नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी करून,राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करा,आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना ही सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन मा.आशिषजी देसाई साहेब यांनी शिवसैनिकांना केले.मा.सहसरामजी कोरेटे साहेब शिवसैनिकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले,पक्षातील हेवेदावे विसरून सर्व जण एकत्र येऊन शिवसेना पक्षाची ताकद येत्या निवडणुकांमध्ये दाखवून देत,सत्तेत शिवसेना पक्षाचे वाटेकरी बनण्याची जिद्द शिवसैनिकांनी ठेवावी असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.

आढावा बैठकीत उपस्थित शिवसैनिक…
या आढावा बैठकीत “ग्रामरत्न” राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.आशिषजी देसाई साहेब आणि मा.सहसरामजी कोरेटे साहेब यांनी मा.संदीपजी ठाकूर शिवसेना जिल्हा प्रमुख ( गडचिरोली- आरमोरी विधानसभा क्षेत्र) यांचे कौतुक केले आहे.
मा.पुंडलिकजी येवले सर शिवसेना जिल्हा प्रमुख (ओबीसी/व्हीजेएनटी) गडचिरोली जिल्हा यांचा आज दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोज मंगळवार ला ” वाढदिवस ” याच कार्यक्रमामध्ये केक कापून साजरा करण्यात आला.उपस्थित शिवसैनिकांनी आणि जिल्ह्यातील समस्त शिवसैनिकांनी मा.येवले सरांना सुभेच्छा दिल्या.
या आढावा बैठकीमध्ये गडचिरोली-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकारी यांचे नियुक्ती पत्र मा.आशिषजी देसाई साहेब आणि मा.सहसरामजी कोरेटे साहेब यांचे शुभहस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाला गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेना पदाधिकारी आणि महिला शिवसेना पदाधिकारी तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना (ओबीसी/व्हीजेएनटी) चे जिल्हा/ तालुका / शहर पदाधिकारी तसेच महिला शिवसेना जिल्हा/ तालुका/शहर पदाधिकारी,आणि शिवसेना बंगाली आघाडी चे जिल्हा/ तालुका/ शहर पदाधिकारी आणि महिला शिवसेना बंगाली आघाडी जिल्हा/ तालुका/ शहर पदाधिकारी, युवासेना,युवतीसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.