गौरीपूर येथे जय दुर्गा स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन तर्फे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन – माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची उपस्थिती…

244

चामोर्शी, दि. ०१ सप्टेंबर २०२५ :
चामोर्शी तालुक्यातील गौरीपूर येथे जय दुर्गा स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन, गौरीपूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य फुटबॉल स्पर्धा २०२५ चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

या फुटबॉल प्रतियोगिता स्पर्धेचे अध्यक्ष तथा सहउद्घाटन प्रसंगी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी पायाने फुटबॉल टोलवून कार्यक्रमाला शुभारंभ करत आनंद व्यक्त केला.

यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मा.खा. डॉ.अशोकजी नेते म्हणाले की,”गौरीपूर येथे गेल्या चाळीस वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवत जय दुर्गा स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन दरवर्षी उत्साहाने फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करत आहे. या खेळामुळे गावातील तरुणाईत एकात्मता, शिस्त आणि खेळाडूवृत्ती वृद्धिंगत होत आहे. मी दरवर्षी या फुटबॉल स्पर्धेच्या कार्यक्रमाला सहभागी होऊन येत असतो. येत्या आठ–दहा दिवस चालणाऱ्या या खेळांसाठी आयोजक, खेळाडू आणि नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”

तसेच गावातील विविध समस्या जाणून घेत, त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले. विशेषतः ग्राउंड डेव्हलपमेंटसंबंधीची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फित कापून उद्घाटन सोहळा पार पडताना मान्यवर

या कार्यक्रमाच्या मंचावर प्रामुख्याने गडचिरोली चे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, कि.मो.प्र. सचिव रमेशजी भुरसे, भाजप जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजप चामोर्शी मंडळ अध्यक्षा रोशनीताई वरघंटे, घोट मंडळ भाजपा अध्यक्ष राकेश सरकार,युवा नेते नरेश अल्लसावार, नीरज रामानुजनवार, रेवनाथजी कुसराम, निखिल धोडरे, शेषराव कोहळे, भाविकजी आभारे, उपसरपंच महानंदा हलदार (गौरीपूर), व्ययस्थापक कमिटीचे अध्यक्ष कर्णधर बाकची, उपाध्यक्ष अमित मंडल, सचिव देवाशिष मंडल, अंकुश बारई, परिमल रॉय, अनुप मिस्त्री, उमेश अग्रवाल, सुजित रॉय, तरुण गाईन, अशीम मुखर्जी,कार्तिक शिल, देब्रत बिस्वास यांसह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गौरीपूर येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने कार्यक्रमास उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले. खेळाडू व प्रेक्षकांच्या गजरात ही स्पर्धा प्रारंभ झाली.