शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहणे सक्तीचे करा…

211

शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहणे सक्तीचे करा

– भ्रष्टाचार बोध अन्वेषण फोंडेशनचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साखरे यांचे मागणी.

प्रतिनिधी सतीश कुसराम

आरमोरी : शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करा अशी मागणी भ्रष्टाचार बोध अन्वेषण फोंडेशनचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साखरे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे.

गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाते. हा जिल्हा विस्ताराने मोठा असून जंगलाने व्यापलेला आहे. गडचिरोली जिल्हा अति मागास जिल्हा आहे या जिल्ह्याचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे कामाविषयी कर्मचाऱ्यांची उदासीनता. महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश सक्तीचे केले असते तरी बहुतांश कर्मचारी जिल्हा तालुका ठिकाणाहून ये–जा करीत आहे. याचाच परिणाम विकास कामावर पडतो व वेळोवेळी जनतेचे काम होत नाही. कर्मचारी शासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहे.

शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहणे सक्तीचे करावे, मुख्यालयात न राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर योग्य ते कारवाई करावी न केल्यास भ्रष्टाचार फोंडेशनच्या वतीने समोरील कारवाई करून वरील स्तरावर पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात येईल असेही प्रसिद्ध पत्रकातून भ्रष्टाचार बोध अन्वेषण फोंडेशनचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साखरे यांनी केली आहे.