राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती तसेच NHM संघटना गडचिरोली .दि.19/08/2025 पासुन उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे बेमुद्दत कामबंद आंदोलन महाराष्ट्र शासनाच्या दि. १४/०३/२०२४ रोजीच्या निर्णयानुसार नियमित शासन सेवेत समायोजन व बदली धोरण, वेतनवाढ, ईपीएफ, आरोग्य व अपघात विमा आदी लागू करण्याच्या मागणीसाठी “बेमुदत कामबंद” आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनातील उपस्थित कर्मचारी.
सार्वजनिक आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षांपासून अखंड सेवा बजावत आहेत. शासनाने या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, यासाठी मी आमदार असताना सातत्याने प्रयत्न केले आहेत. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या विधानसभेत मांडल्या होत्या. विशेषतः १० वर्षांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणासाठी मी सभागृहात ठाम आवाज उठवला होता. या पाठपुराव्यामुळेच सरकारने नियमितीकरणाचा आदेश जारी केला.
परंतु अत्यंत खेदाने सांगावे लागते की, आदेश असूनही परिचारिकांसह अनेक कर्मचाऱ्यांचे आजतागायत नियमितीकरण झालेले नाही. हे फक्त निराशाजनकच नाही तर त्यांच्या निष्ठावंत परिश्रमांचा व योगदानाचा अवमान आहे. हे मागण्या पूर्ण होई पर्यंत संप मागे नाही .
महाराष्ट्र राज्य NHM संघटना व कर्मचारी एकत्रीकरण समिती .







