*सुभाषग्राम येथील फुटबॉल स्पर्धेला भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची भेट*…

82

*नेताजी सांस्कृतिक तथा क्रीडा मंडळ सुभाषग्राम च्या वतीने भव्य फुटबॉल स्पर्धेचे आयोजन*

प्रतिनिधी/चामोर्शी:

*15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पर्धेचे उ‌द्घाटन गडचिरोली जिल्ह्याचे सह पालक मंत्री ना.आशीषजी जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भव्य फुटबॉल स्पर्धेचे मोठ्या थाटात करण्यात आले. माजी आमदार डॉ देवराव होळी काही कामानिमित्त मुंबई प्रवासात असल्यामुळे उदघाट्न सोहळ्याला उपस्थित राहु शकले नव्हते.त्यामुळे त्यांनी आज फुटबॉल स्पर्धेला भेट दिली. त्यांच्या हस्ते यांच्या हस्ते विष्णपूर व बालाघाट सामान्यचे नाणेफेक करून सामन्याचे सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांनी खेळाडूंची भेट घेत स्पर्धेत उस्फुर्त सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानत मनोबल उंचावले. व फूटबॉल स्पर्धेच्या आयोजनाची परंपरा जोपासत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.*

खेडळूंशी संवाद साधताना डॉ देवराव होळी

*यावेळी निरंजन बाच्छाड, संतोष रॉय, गिरीश सरकार, नितीश बाच्छाड, मिथुन बिश्वास, समीर रॉय, श्यामल रॉय, रेभा सरदार, गोपाल टिकेदार, आशिष बारई, प्रशांत मल्लिक, विकास मंडल, महानंद हलदार उपस्थित होते.*