*राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या तक्रारीची दखल व संपूर्ण लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कायपालट!*…

271

अहेरी दिनांक 21 ऑगस्ट 2025:

प्रतिनिधी/प्रीतम गग्गुरी:

लगाम प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या विविध गावांमध्ये डेंगू व मलेरियाची साथ असताना सगळीकडे तापाची लाट
असतांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता व चयन समिती अध्यक्ष ग्यानेंद्र विश्वास यांनी भ्रमणध्वनीवर जिल्हा आरोग्य अधिकारी शिंदे यांचेशी संपर्क करून येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लगाम येथील गलथाणपणा बाबत, माहिती दिली व चर्चा केली

*प्राथमिक आरोग्य केंद्र लगाम*

या सर्व विषयाची दखल जिल्हा आरोग्य अधिकारी शिंदे यांनी घेतली व तात्काळ दुसऱ्या दिवशी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र लगाम येथे भेट दिली व येथील सर्व कारभाराबद्दल माहिती जाणून घेतली सर्व स्वच्छता व इतर कार्यप्रणाली बाबत त्यांनी प्रत्यक्ष लक्ष दिला व सर्वांना आरोग्याच्या काळजी घेण्याबाबत व स्वच्छता व इतर व्यवस्था शिस्त दुरुस्त करण्याबाबत आदेश दिले व या शिस्तप्रियतामुळे व त्यांच्या आदेशाने संपूर्ण लगाम प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेले कर्मचाऱ्यांनी जीव लावून काम करणे सुरू केले आहे व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेण्यासाठी येथील आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक मोठ्या सेवा तत्परतेने काम करीत आहेत याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ भारत खटी, राहुल भाऊ झोडे, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सोदोंरकर,विदर्भ अध्यक्ष जावेद सैय्यद, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा मनीषा मडावी, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा सचिव प्रकाश थुल,जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, नानु उपाध्ये,बाळू मामीडवार, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत शहा गडचिरोली तालुका अध्यक्ष मोरेश्वर भांडेकर उपाध्यक्ष दीपक सातपुते चामोर्शी तालुका सचिव संतोष बुरांडे,तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड,भीमराव वनकर, तालुका अध्यक्षा रुपाली कावळे, महिला आघाडी अध्यक्षा विशाखा सिन्हा यांनी आभार व्यक्त केले आहे,