चक्क !वाघाने घेतली मोटर सायकलवर उडी: पण! अंदाज चुकल्यामुळे युवक थोडक्यात बचावला…. सावधान! रात्री प्रवास करणाऱ्यांना मालडोंगरी- चौगान मार्गावर होत आहे चक्क वाघाचे दर्शन

168

ब्रम्हपूरी प्रतिनिधी:-
निव्वळ! वाघ हा जरी शब्द उच्चारला तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. पण असाच थरारक प्रसंग प्रत्यक्षदर्शी चौगान येथील एका वृत्तपत्राचे युवा पत्रकार सुरज दोनाडकर याने अनुभवला आहे.
चंद्रपूर जिल्हा जंगल व्याप्त असलेला जिल्हा आहे. येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जंगली प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्यटक सुद्धा ताडोबाला हजेरी लावत असतात. ह्याच जंगलाचा भाग ब्रम्हपुरी तालुक्याला जोडलेला आहे.त्यामुळे अनेक हिंस्र जंगली प्राण्यांचा वावर सुद्धा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. त्यामुळे या तालुक्यात वन्यजीव आणि मानव असा संघर्ष नेहमीच बघायला मिळतो. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या अशा बऱ्याच घटना तालुक्यात घडलेल्या आहेत.
ब्रम्हपुरी तालुका हा वाघाच्या तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नेहमीच भर रस्त्यावर वाघाचे प्रवासी नागरिकांना दर्शन होत असते. अशा परिस्थितीतही नागरिकांना जीव मुठीत घेऊन शेतीचे कामे अथवा रात्री अप रात्री प्रवास करावा लागतो.
शनिवारी ९ डिसेंबर रोजी वेळ सायंकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान ब्रम्हपुरीहुन आपले कामे आठोपुन सुरज दोनाडकर हे मालडोंगरी-चौगान मार्गाने चकबोथली (कसर्ला) येथे आपल्या स्व गावी मोटार सायकलने जात असतांना धानोली पोहाचक फाट्याजवळील नहराच्या कडेला दबा धरून बसलेल्या वाघाने मोटार सायकलचा लाईट बघून चक्क मोटरसायकलवर उडी घेतली खरी! पण, वाघाची झेप घेण्याचा अंदाज चुकल्यामुळे एखाद्या फुटाचा फरकावरुन रोडच्या या बाजूवरून दुसऱ्या बाजूला निघून गेला.मात्र क्षणभरही विचलित न होता घाबरट परिस्थितीतही थरारक प्रसंगाचा सामना करीत गाडीची स्पीड वाढवून सुरज चौगान गावात पोहोचल्यानंतर लगेचच त्यांनी जवळच्या काही मित्रांना फोन करून सर्व घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली.
त्यामुळे चौगान- मालडोंगरी ब्रम्हपुरी मार्गे रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगने गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात अशी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वन विभागाने नागरिकांना सूचना देण्यासाठी रस्त्यावर फलक लावण्याची गरज आहे.