Homeचंद्रपूरवर्धा नदीपात्रात तिघांना जलसमाधी...चंद्रपूर बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे व मुलाचा समावेश

वर्धा नदीपात्रात तिघांना जलसमाधी…चंद्रपूर बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे व मुलाचा समावेश

बल्लारपूर: तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांचे मोठे वडील घनश्याम झित्राजि पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते.त्यांचे अस्थिविसर्जन आज रविवार ( दि.१९ ) दुपारी २ वाजता दरम्यान वर्धा – इराई संगमावर गेले .दरम्यान मुलगा व भाचा नदीच्या प्रवाहात बुडत होते.त्यांना वाचविण्यासाठी उपसभाती गोविंदा पांडुरंग पोडे यांनी नदी पात्रात उडी घेतली.दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघानाही वर्धा नदीपात्रात जलसमाधी मिळाली.ही मनाला चटका लावणारी व ह्रदयदायक घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) जवळ वर्धा – इराई नदीच्या संगमावर घडली.

बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील राहणारे व चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पांडुरंग पोडे ( ४७), त्यांचा एकुलता मुलगा चेतन गोविंदा पोडे ( १६ ) व त्यांचा भाचा गणेश रवींद्र उपरे ( १७) असे वर्धा नदी पात्रात जलसमाधी मिळालेयाची नावे आहेत. गोविदा पोडे हे बल्लारपूर पंचायत समितीचे देखील माजी सभापती होते. एकाच कंटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशित शोककळा पसरली आहे. वर्धा नदी पात्रात कुटुंबातील सदस्यां समोर तिघे वाहून गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान शोध मोहिमेत सायंकाळी ५.४५ वाजता गोविंदा पोडे यांचा मुलगा चेतन पोडे याचे प्रेत नावाड्यानी बाहेर काढले.अन्य दोघांच्या प्रेताचा शोध मोहीम सुरु आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!