Homeचंद्रपूरमेरी माटी मेरा देश या उपक्रमासाठी आनंद निकेतन कॉलेजच्या दोन विदयार्थ्यांची निवड......

मेरी माटी मेरा देश या उपक्रमासाठी आनंद निकेतन कॉलेजच्या दोन विदयार्थ्यांची निवड… वरोरा येथून अमृत कलश यात्रेला रवाना…. दिल्ली येथील सोहळ्यात होणार सहभागी…

वरोरा :महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथील हे दोन्ही विद्यार्थी समाजशास्त्र या विषयात एम.ए. ला शिक्षण घेत आहे.आणि राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे दोन्ही विद्यार्थी स्वयंसेवक आहे

शुभम शिवशंकर आमने हा विद्यार्थी एम.ए.समाजशास्त्र या विषयात शिक्षण घेत असून परसोडा या गावातील रहिवाशी आहे.गावामध्ये विविध नावीन्य उपक्रम आणि विविध कार्यक्रम घेत असतो. सामाजिक क्षेत्रात आवड असल्यामुळे शारदा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून वरोरा तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, व सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे.
कु.निकिता गजानन माणूसमारे ही विद्यार्थीनी एम. दृतीय वर्षाला शिक्षण घेत आहे. पाचगाव (ठा) येथील रहिवाशी असून ती देखील विविध सामाजिक उपक्रम घेत असून कार्यक्रमात सहभागी होत असते.
दोन्ही विद्यार्थ्यांची निवड ही नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर यांच्या माद्यमातून वरोरा तालुक्यातून केली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ या केंद्र सरकारच्या उपक्रमात प्रत्येक गावात विरांना वंदन करणार स्मारक तयार करून त्या गावाची माती तालुक्याच्या ठिकाणी गोळा करण्यात येत असून वरोरा तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ८१ ग्रामपंचायत मधून गोळा करण्यात आलेल्या मातीचा मंगल कलश दिल्ली येथे विरांच्या स्मरणार्थ तयार करण्यात येत असलेल्या वाटीकेसाठी वापरण्यात येणार आहे.
कार्यक्रम दि.२६ व २७ ऑक्टोबर रोजी क्रांती मैदान मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती होणार असून दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती मध्ये दि.३१ ऑक्टोबर ला संपन्न होत आहे.
कार्यक्रमात तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शुभम आमने आणि निकिता माणुसमारे यांची निवड करण्यात आली असून त्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
पंचायत समिती वरोरा येथून नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांना कलश सोपविण्यात आला त्यावेळी गट विकास अधिकारी वरोरा संदीप गोडशेलवार आणि नरेंद्र पेटकर, प्रणव बक्षी व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
शुभम आमने आणि कु.निकिता माणूसमारे यांनी तालुक्यातील पंचायत समिती वरोरा चे गट विकास अधिकारी संदीप गोडशलवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन व नेहरू युवा केंद्र चंद्रपूर चे जिल्हा युवा अधिकारी श्री.शमशेर सुभेदार आणि जिल्हा प्रशासनाचे व अन्य मार्गदर्शकांचे या प्रसंगी आभार व्यक्त केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!