Homeअहेरीसन्मित्र शारदा मंडळ व भाजपा युवा मोर्चा अल्लापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य...

सन्मित्र शारदा मंडळ व भाजपा युवा मोर्चा अल्लापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीर

प्रितम म. गग्गुरी(उपसंपादक)

आल्लापल्ली :- आज दि. २३/१०/२०२३ रोजी सन्मित्र शारदा मंडळ व भाजपा युवा मोर्चा अल्लापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. दसरा या सणाचा औचित्य साधून गरजू लोकांना प्रथमोपचार व रोगाविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने या शिबाराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात लोकांचा पुरेपूर प्रतिसाद मिळाला व शिबिराच्या निमित्याने आयुष्यमान भारत कार्ड बद्दल समुपदेशन करून 60 लोकांचे आभा कार्ड बनवण्यात आले . उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीश नाकट सर व डॉ. अस्मिता देवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. यादव वनकर श्री गोपाल कोडापे, दीप्ती कोहोडे, वनिता मांदाडे, व अजय राठोड या चमू सोबत शिबिराचे कर्तव्य पार पाडन्यात आले. संकेत कंदिकूरवार, सुरज सल्लम, स्वप्नील गड्डमवार, राहुल परचाके, रोहित गड्डमवार, रवी बोडेवार,गौरव इरकीवार, शुभम सल्लम गोलू गाजलवार व या शिबिराचे नेतृत्व भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष कृणाल सल्लम यांनी केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!