Homeचंद्रपूरयशवंतनगर , पडोली येथे महात्मा गांधी जयंती साजरी चित्रकला व निबंध...

यशवंतनगर , पडोली येथे महात्मा गांधी जयंती साजरी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन

चंद्रपूर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथे 2 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबर 2023 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून गांधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे . या अनुषंगाने 5 ऑक्टोंबर रोज गुरुवारला सामुदायिक विकास विशेषीकरण असलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने यशवंतनगर, पडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वच्छता या विषयावर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन मा. प्रा. डॉ. प्रगती नरखेडकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. चित्रकला आणि निबंध स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग कौतुकास्पद होता. शाळेतील मुख्याध्यापिका मा. सुनिता पोहाने मॅडम यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील इतर शिक्षकवृंद सौ. सुनंदा अरखराव, सौ. मंजुषा फुलझेले , सौ. उज्वला गायकवाड, सौ. बक्षी मॅडम आणि विद्यार्थीवर्ग उपस्थित होते. बक्षीस वितरणाचे संचलन कु. पुजा भोयर हिने केले, तसेच आभार कु. रीना मडावी हिने मानले. तसेच इतर एम.एस. डब्लू. चे विद्यार्थी कु. अंकिता शेंडे व प्रशिक तावाडे यांची उपस्थिती होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!