Homeगोंडपीपरीपारंपरिक शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक शिक्षण घ्यावे.-प्राचार्य स्मिता चिताडे

पारंपरिक शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक शिक्षण घ्यावे.-प्राचार्य स्मिता चिताडे

गडचांदूर- आजच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाचा प्रवाह सोडून लवकरात लवकर स्वालंबी बनवणारे स्पर्धात्मक शिक्षण ग्रहण करून स्वतःच्या पायावर उभे राहावे. खाजगीकरणामुळे कायमस्वरूपाची नोकरी मिळेल हे अपेक्षा बाळगने गैर आहे.असे प्रतिपादन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य सौ. स्मिता चिताडे यांनी केले. ते प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय तर्फे आयोजित सत्कार समारंभ व विद्यार्थी पर मार्गदर्शन पर कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करत होते.पुढे मार्गदर्शन करताना प्राचार्य स्मिता चिताडे यांनी महाविद्यालयात आल्यावर मुलांना घरून पैसे आणण्याची वेळ येऊ नये, यासाठी अभ्यासक्रमात काही नवीन पर्यायांचाही वापर करायला हवा,पारंपारिक शिक्षण पद्धती आजच्या युगात कालबाह्य झालेली आहे यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धेयुक्त शिक्षण ग्रहण केले पाहिजे.जेणेकरून विद्यार्थी शैक्षणिक अवस्थेत असतानाच त्याला स्पर्धा परीक्षा विषयी माहिती मिळेल व ते कार्य ग्रामीण भागातील असून सुद्धा प्रेरणा महाविद्यालय करत असल्याने त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब असल्याचे समाधान व्यक्त केले.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणांमधून विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये आणि जीवनामध्ये सुसह्य होण्यासाठी सतत ज्ञान मिळवण्याबरोबरच स्पर्धात्मक ज्ञान सुद्धा मिळवणे गरजेचे आहे. स्पर्धकात्मक शिक्षण पद्धतीच ही भविष्याची खरी ओळख आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.व आदर्श शिक्षक पुरस्कार हा प्राचार्य स्मिता चिताडे मॅडम यांनी सतत पस्तीस वर्षे केलेल्या शैक्षणिक कार्याचे फलित असल्याचे स्पष्ट केले.स्मिता चिताडे मॅडम या शैक्षणिक व सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असून अशा बहुआयामी व्यक्तिमतवास हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे संपूर्ण परिसरातील त्याचा आनंद होत आहे असे प्रतिपादन केले.महाविद्यालयातर्फे शाल,श्रीफळ,व सन्मान चिन्ह देऊन सौ.स्मिता चिताडे मॅडम यांचा प्रेरणा महाविद्यालया तर्फे सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात ही महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप्रज्वलन करून करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपाली टेकाम हिने केले.सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे,सत्कारमूर्ती सौ. स्मिता चिताडे,मा.अरविंद मुसने, प्रा. प्रदीप परसुटकर सर ,प्रा. राहुल ठोंबरे प्रा.एजाज शेख, प्रा. मनीषा मरसकोल्हे, प्रा. रोशनी खाटे प्रा.सचिन पवार,प्रा. सचिन धनवलकर यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे संचालन प्रांजल महाकुलकर तर आभार आकांक्षा ढवस हिने मानले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!