वरोरा: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सलग्नित संपूर्ण महाविद्यालयांमधून आनंद निकेतन महाविद्यालयाला सत्र 2022-23 मधील विविध खेळांच्या अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा सत्र 2022 – 23 चा क्रीडा चषक महाविद्यालयाला देण्यात आला. आज पर्यंतच्या महाविद्यालयाच्या क्रीडा इतिहासामध्ये प्रथमच आननिकेतन महाविद्यालयाला विद्यापीठाचे क्रीडा चषक प्राप्त झाले. गोंडवाना विद्यापीठाचा स्थापना दिवस व महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी दिनांक 2 ऑक्टोबर २०२३ ला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री मीना, प्र -कुलगुरू डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखंन व गडचिरोली क्षेत्राचे माननीय आमदार श्री देवराव होळी तसेच विद्यापीठांच्या आधीसभा सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे आणि क्रीडा विभाग प्रमुख प्रा. तानाजी बायस्कर यांनी हा पुरस्कार स्वीकृत केला. तसेच याच पुरस्कार वितरण सोहळ्यात महाविद्यालयाचा Msc प्रथम वर्षाचा विद्यार्थी अभिजित अष्टकार याला विद्यापीठाचा उत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार वितरीत करण्यात आला. क्रीडा स्पर्धामध्ये उत्कृष्ट महाविद्यालय या पुरस्काराचे मानकरी महाविद्यालयाचे खेळाडू आणि त्यांच्यावर मेहनत घेणारे क्रीडा शिक्षक प्रा. तानाजी बायस्कर आहे, त्यांच्यामुळेच हा पुरस्कार महाविद्यालयाला मिळाला.असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी केले.
महाविद्यालयाने सत्र 2022-23 मध्ये
मल्लखांब (पुरुष/महिला)- प्रथम क्रमांक
योगा (पुरुष) – प्रथम क्रमांक
मैदानी स्पर्धा (पुरुष/महिला)- प्रथम क्रमांक
सपॅक टँकरा (पुरुष/महिला)- प्रथम क्रमांक
खोखो (पुरुष)- प्रथम क्रमांक
सर्कल स्टाईल कब्बडी (पुरुष)- प्रथम क्रमांक
कार्फबॉल मिक्स (पुरुष/महिला)- प्रथम क्रमांक
हँडबॉल (पुरुष)- प्रथम क्रमांक
क्रिकेट (पुरुष)- प्रथम क्रमांक
तलवारबाजी (महिला)- प्रथम क्रमांक
खोखो (महिला)- द्वितीय क्रमांक
सॉफ्टबॉल (पुरुष/महिला)- द्वितीय क्रमांक
नेटबॉल (महिला)- द्वितीय क्रमांक
फुटबॉल (पुरुष)- द्वितीय क्रमांक
तलवारबाजी (पुरुष)- द्वितीय क्रमांक
कब्बडी (पुरुष)- द्वितीय क्रमांक
क्रॉसकंट्री (महिला)- द्वितीय क्रमांक
योगा (महिला)- तृतीय क्रमांक
बास्केटबॉल (महिला)- तृतीय क्रमांक
नेटबॉल (पुरुष)- तृतीय क्रमांक
सर्कल स्टाईल कब्बडी (महिला)- तृतीय क्रमांक
रस्सीखेच (पुरुष/महिला) – तृतीय क्रमांक
बॉल बॅडमिंटन (महिला)- तृतीय क्रमांक
हँडबॉल – (महिला)- तृतीय क्रमांक
क्रॉसकंट्री (पुरुष)- तृतीय क्रमांक
अश्या एकूण 30 क्रीडा प्रकारांमध्ये महाविद्यालयाने आपला विजय संपादित करून एकत्रित चॅम्पियनशिप महाविद्यालयाच्या नावावर केली.
विद्यापीठाचा उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल महारोगी सेवा समितीचे सचिव डॉक्टर विकास आमटे सौ पल्लवीताई आमटे श्री कौस्तुभ आमटे तसेच संपूर्ण विश्वस्त मंडळ व महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.