Homeचंद्रपूरश्री शिवाजी महाविद्यालयाच्या 'यशश्री' वार्षिकांकास विद्यापीठाचा प्रथम पुरस्कार

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या ‘यशश्री’ वार्षिकांकास विद्यापीठाचा प्रथम पुरस्कार

राजुरा :आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा द्वारा श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या ‘यशश्री’ वार्षिकांकास गोंडवाना विद्यापीठाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. हा वार्षिकांक भारतातील विविधांगी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नेत्रदिपक कार्यावर आधारित ‘महिला विशेषांक’ म्हणून प्रकाशित करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना ,आमदार देवराव होळी, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते २ ऑक्टोबर विद्यापीठाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त होणान्या कार्यक्रमात प्रथम पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

यापूर्वीही ‘यशश्री’ वार्षिकांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचे पुरस्कार प्राप्त झाले. याशिवाय महाविद्यालयाचा ‘यशश्री’ वार्षिकांकास अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई द्वारा आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालीका स्पर्धेचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला.

दरवर्षी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाशजी जाधव साहेब, प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड सर, उपप्राचार्य डॉ. आर. आर. खेरानी सर यांच्या मार्गदर्शनात ‘यशश्री’ विशेषांक वेगवेगळ्या शिर्षकाखाली प्रकाशित होत असून यापूर्वी ‘भारतरत्न विशेषांक’, ‘भारतीय समाजसेवक विशेषांक’, ‘पर्यावरण, स्वच्छता व आरोग्य विशेषांक’, ‘उद्बोधन विशेषांक’, ‘युवाशक्ती विशेषांक’ अशा विविध विषयांवर वार्षिकांक प्रकाशित झाले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. वारकड सर यांच्या मार्गदर्शनात मुख्य संपादक डॉ. संतोष देठे, सहसंपादक डॉ. संजय शेंडे, प्रा. व्यंकटरमना, डॉ. संजय लाटेलवार, डॉ. सारीका साबळे, डॉ. चेतना भोंगाडे, डॉ. वनिता वंजारी तसेच विद्यार्थी संपादक मंडळाचे प्रमुख प्रज्वल बोबडे, राधिका दोरखंडे, सुरज पचारे, संतोषी सरकार, प्रतिक्षा वासनिक, कशिष भोंगळे, शशीकांत गेडाम, कल्याणी धाबेकर यांनी संपादक मंडळात कार्य केले. तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अविनाश निलकंठ दोरखंडे यांचे सुद्धा या वार्षिकांकास मोलाचे सहकार्य लाभले.

गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धेत ‘यशश्री’ वार्षिकांकाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यगण, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचेकडून संपादक मंडळ व विद्यार्थी संपादक मंडळ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!