Homeचंद्रपूरश्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वच्छता अभियान म.गांधी व लाल बहादूरशास्त्री...

श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वच्छता अभियान म.गांधी व लाल बहादूरशास्त्री जयंती साजरी

चंद्रपूर : येथील श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर ( येरगुडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस ) तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ह्यांच्या जयंतीनिमित्त स्वछता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत स्वछता अभियान राबविण्यात आले.

यावेळी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि पुष्पार्पण करून सर्व निदेशक, कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थ्यांकडुन विनम्र अभिवादन करण्यात आले. प्राचार्य राजेश एम पेशट्टीवार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री ह्यांच्या कार्याचा उल्लेख करीत त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यानंतर सर्वांना स्वच्छतेचा सामाजिक संदेश देण्यासाठी संस्थेतून प्रभातफेरी काढण्यात आली आणि संस्थेत परत येऊन संस्थेचा बाहेरील आणि आतील परिसरात स्वछता करण्यात आली. यावेळी अभियानात संस्थेचे सर्व निदेशक, कर्मचारी आणि सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या हिरारीने सहभाग घेतला.
स्वछता अभियान राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा विद्या व्ही.येरगुडे, सचिव अमित व्ही.येरगुडे आणि उपाध्यक्ष अभिषेक व्ही.येरगुडे यांचे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद मानले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!