Homeचंद्रपूरगांधी विचारधारेनेच देशातील धर्मांधता व जातीय भेदाच्या राजकारणाचा अंत - विरोधी पक्षनेते...

गांधी विचारधारेनेच देशातील धर्मांधता व जातीय भेदाच्या राजकारणाचा अंत – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार..

देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणारे महात्मा गांधी यांची त्याग व बलिदानाची गाथा साता समुद्रपार पोहचली असून अनेक देशातील महत्त्वकांक्षी लोक गांधी विचार धारेला रुजविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र देशातील सत्याधाऱ्याकडून महात्मा गांधींना बदनाम करून त्यांच्या मारेकऱ्यांना “थोर नायक’ ठरवत धर्मांधता व जातीय भेदाचे राजकारण करून अराजकता माजविण्याचे काम सुरू आहेत. अशा मनुवादी व जातीयवादी अराजकतेला ठेचून काढायचे असेल तर गांधी विचारधारा मुळापासून रुजविणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी केले ते ब्रह्मपुरी येथे महात्मा गांधी जयंती उत्सव समिती द्वारा आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

 

आयोजित व्याख्यान कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रमुख व्याख्यान कर्ते ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत झटाले, प्राचार्य डॉ. देविदासजी जगनाडे, ॲड. गोविंदराव भेंडारकर, धनराजजी मुंगले, नगराध्यक्ष रिता उराडे, उपनगराध्यक्ष अशोक रामटेके, ऋषीजी राऊत, विठ्ठलराव गुड्डेवार, डॉ. नामदेव कोकोडे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, महात्मा गांधींचे महत्व देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात तीळ मात्र ही योगदान न देणाऱ्या व इंग्रजांची चाटुगिरी करणाऱ्या फितुरांना काय कळणार ? ना शस्त्र ,ना दारूगोळा, ना बळाचा वापर करता आपल्या अहिंसावादी विचारातून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे व त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची पत्नी कस्तुरबा यांनी महिलांसाठी दिलेले योगदान हे इतिहासात अजरामर आहेत. मात्र महात्मा गांधींच्या बदनामीचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांकडून रचल्या जात असले तरी गांधी विचारधारा ही कधीच नष्ट होणारी नाही यावेळी ते म्हणाले.

यानंतर अकोला येथील प्रसिद्ध व्याख्यान कर्ते ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत झटाले यांनी आपल्या “मजबुती का नाम महात्मा गांधी ‘ यातून गांधीजींवर करण्यात येणारी देश फाळणीची टीका, त्यांच्या मवाळ भूमिकेला मजबूरी का नाम महात्मा गांधी असे संबोधणारे सोबतच महात्मा गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्या विचाराचे समर्थन करणारे यांच्या बुद्धी भिकारीपणाचा चांगला समाचार घेतला. गांधीजींनी वीर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे सह तुरुंगातील वि. दा. सावरकर यांच्याही सुटकेसाठी केलेले आटोकाट प्रयत्न याचे पुराव्यासह विविध पुस्तकात प्रकाशित केलेल्या माहिती तत्त्वावर महत्व विषद केले.

तद्वतच ज्या गांधींवर एक लक्ष पाच हजार लेखकांकडून पुस्तकांची लिखाण झाले व जगातील 70 देशांमध्ये गांधीजींची पुतळे बांधले अशा महान थोर पुरुषांच्या अवमान करण्यासाठी देशातील असमाजिक तत्त्वांकडून थोर महात्म्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधल्या जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. सोबतच हिंदूराष्ट्र ही संकल्पना पूर्णतः पटवून न देता केवळ सत्ता प्राप्तीसाठी हिंदू राष्ट्र संकल्पना राबवू पाहणारे देशात केवळ अराजकता माजविण्यासाठी हिंदू खतरे मे है चा नारा देतात व जाती जातींमध्ये द्वेष दंगली निर्माण करतात असा घनाघात करत व्याख्यानकार चंद्रकांत झटाले यांनी आपल्या व्याख्यानातून मांडला. देश अधोगतीच्या मार्गावर आणून पूर्णता उध्वस्त करण्याचा हा डाव मोडून काढण्यासाठी देशाला पुन्हा गांधी विचारांची गरज आहे असे ही ते यावेळी म्हणाले.

गांधी उत्सव समितीद्वारे पदयात्रा रॅली

सदर रॅली ब्रम्हपुरी शहरातील हुतात्मा स्मारक ते बाजार चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या पदयात्रेत राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार हे देखील सहभागी झाले होते. पदयात्रेत हुबेहूब गांधीजींसारखे दिसणारे नागभीड येथील रंद्ये यांनी गांधीजींच्या वेषभुषेत सहभाग घेतला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात पुरुष, महीला, तरुण व तरुणी सहभागी झाले होते

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!