महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस ची विस्तारित आढावा बैठक काल टिळक भवन मुंबई इथे संपन्न झाली या आढावा बैठकीला अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या राष्ट्रीय अध्यक्ष नेत्ता डीसुजा मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याच सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना भाऊ पटोले आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्ष संध्या ताई सव्वालाखे यांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नेत्ता डीसुजा मॅडम यांनी सर्व जिल्हाध्यक्षांकडून तालुका अध्यक्ष आणि जिल्ह्यात सुरू असलेला संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला. प्रदेशाध्यक्ष नाना भाऊं पटोले यांनी महिलांनी महागाई विरोधात आक्रमक प्रचार करून मोदी सरकारला धडा शिकवला पाहिजे असे आवाहन केले. प्रदेशाध्यक्ष संध्या ताई सव्वालाखे यांनी मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या मागे खंबीरपणे पणे उभी आहे, तुम्ही सर्व मेहनत करा आणि पक्षाला जनाधार मिळवून द्या, माहीलाच पक्षाला उभारी देऊ शकतात असे प्रतिपादन केले. या बैठकीला चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांनी जिल्ह्याचा महिला काँग्रेस चा आढावा सादर केला. नेत्ता डीसुजा मॅडम, आणि प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या पुढे मांडला. यावेळी काँग्रेस चे महाराष्ट्रातील काँग्रेस चे एकमेव दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या आढावा बैठकीला जिल्हाध्यक्ष, सर्व प्रदेश पदाधिकारी व बहुसंख्य महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.