Homeचंद्रपूरशब्दशाळा वक्तृत्व अकॅडमीचे थाटात उद्घाटन... शब्दशाळेच्या माध्यमातुन चंद्रपुरात घडतील भावी वक्ते

शब्दशाळा वक्तृत्व अकॅडमीचे थाटात उद्घाटन… शब्दशाळेच्या माध्यमातुन चंद्रपुरात घडतील भावी वक्ते

चंद्रपूर: बोलण्याने जग जिंकता येते. परंतु आज अनेकजण चारचौघात बोल म्हटले की पोपटासारखे बोलतात पण चारचौघासमोर बोल म्हटले की, अनेकांचा पोपट होतो. आजही अनेकजण माईकपुढे बोलायला घाबरतात. पण ही भीती दूर व्हावी आणि चंद्रपुर जिल्हात बोलणारी पिढी तयार व्हावी यासाठी चंद्रपुरातील चार युवकांनी एकत्र येऊन शब्दशाळा वकृत्व अकॅडमीची स्थापना केली.

शब्दशाळा वक्तृत्व अकॅडमीचे नुकतेच ठमके सर अकॅडमीचे संचालक सचिन ठमके यांच्या हस्ते मधुबन प्लाझा, चंद्रपूर येथे उद्घाटन संपन्न झाले. शब्दशाळेचे उद्घाटन कुंडीमध्ये पाणी टाकून आणि फित कापून करण्यात आले. ठमके यांनी सार्वजनिक जीवनामध्ये वक्तृत्वाचे महत्व कसे आहे हे आपल्या मनोगतातून सांगितले आणि शब्दशाळेला शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून शिवब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश मालेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके उपस्थित होते.

शब्दशाळा वकृत्व अकॅडमीची स्थापना करण्यामागील उद्देश शब्दशाळेचे प्रशिक्षक आकाश कडूकर यांनी सांगितले तर संपूर्ण प्रशिक्षणात शिकविल्या जाणाऱ्या बाबी प्रशिक्षक प्रलय म्हशाखेत्री यांनी सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत दुर्गे यांनी केले तर आभार सुरज पी दहागावकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!