Homeगडचिरोलीगडचिरोली चिमूर लोकसभेकरिता काँग्रेस पदाधिकारी दिल्ली दरबारी गडचिरोली - चिमूर लोकसभा...

गडचिरोली चिमूर लोकसभेकरिता काँग्रेस पदाधिकारी दिल्ली दरबारी गडचिरोली – चिमूर लोकसभा सह जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा काँग्रेस पक्ष लढविणार, कामाला लागण्याचे दिल्ली हायकमांडचे पदाधिकाऱ्यांना आदेश

गडचिरोली:: नऊ-दहा महिन्यावर लोकसभा निवडणूक होणार असून त्याचे वारे आतापासूनच वाहू लागलेले आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय मोठा असून तीन जिल्ह्यात पसरलेला आहे. त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याचा समावेश होतो.

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र येणाऱ्या लोकसभेत ही जागा महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावे असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने होत आहे.
वर्तमान परिस्थितीचा विचार करता स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपरिषद बाजार समिती मधे काँग्रेस पक्षाची ताकत राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा अधिक आहे, अहेरी विधानसभा क्षेत्र वगळता इतर कुठल्याही विधानसभेत राष्ट्रवादीची ताकत नाही. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस कडून या लोकसभा क्षेत्राची मागणी होत आहे त्यामुळे स्थानिक राजकीय परिस्थितीचा विचार करता काँग्रेस पक्ष अधिक वरचड ठरतो त्यामुळे ही जागा काँग्रेस कोट्यातच राहावी असा आग्रह गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी दिल्ली दरबारी लावला यावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी च्या वतीने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही व लवकरच राष्ट्रीय स्तरावरून नेते मंडळी लोकसभेतील तालुका निहाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीची तयारी करणार असल्याची माहिती दिली आहे. सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा देखील काँग्रेसच लढविणार असल्याचेही आश्वासन दिले.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे, राष्ट्रीय महासचिव केसी वेणुगोपाल जी, मुकुलजी वासनिक, पवन कुमार बन्सल, अविनाश पांडे, के राजू, माणिक टागोर, आशिष दुवा, शिवाजीरावजी मोघे, माणिकराव जी ठाकरे सह इतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेते मंडळीची भेट घेऊन स्थानिक राजकीय परिस्थितीची माहिती देताना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मारोतराव कोवासे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार पेंटा रामा तलांडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!