Homeचंद्रपूरब्रम्हपुरीतळोधी बाळापूर परीसरात आढळला फोर्स्टेन कॅट स्नेक 

तळोधी बाळापूर परीसरात आढळला फोर्स्टेन कॅट स्नेक 

ब्रम्हपुरी: वन विभाग ब्रह्मपुरी च्या तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील कच्चेपार येथील वन विभागाच्या नाक्यावर चौकिदाराने सिलिंग पंखा सुरू केला तेव्हा पंखा न फिरल्या मुळे वर बघितले पंख्यावर चौकीदाराला एक लांबलचक तपकिरी रंगाचा एक साप लटकत असलेल्या अवस्थेत दिसला . वर तेव्हा त्यांनी स्वाब नेचर केअर संस्था च्या सर्पमित्रांना बोलविले असता अंदाजे साडेतीन ते चार फूट लांबीच्या फोर्स्टेन कॅट स्नेक (forsten’s cat snake) या निमविषारी सापाला रेस्क्यु केला.
फोर्स्टेन कॅट स्नेक हा ‘निम विषारी’ असून याच्या तपकिरी रंगाचे शरिरावर माने पासून शेपटी पर्यंत फिक्कट पांढऱ्या रंगाची आडवे पट्टे असतात, घोनस सापाच्या डोक्याप्रमाने त्रिकोणी आकाराच्या डोक्यावर डोळे हे मोठे आणि ऊठुन दिसतात. हा साप शरीराच्या मानाने लांब असतो अत्यंत शांत स्वभावाचा निशाचर असलेला हा साप भारतात बहुतेक जंगलात आढळतो व झाडाच्या खोलीत अंडे देऊन मादा साप ही त्या अंड्याच्या आसपास राहतो व सरडे , पाली , पक्षांचे अंडे पक्षांचे पिल्ले खातो, मात्र या सापाबद्दलची जास्त ओळख नसल्यामुळे किंवा याला मराठीत असे काही विशेष नाव नाही आहे.
माहितीच्या आधारावर चंद्रपूर जिल्ह्यातील या सापा बद्दल दोनच नोंद असल्याचे निदर्शनास आले. तर ब्रम्हपुरी वन विभागामध्ये ही पहिलीच नोंद तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रात करण्यात आली आहे.
या सापाला सुरक्षित रेस्क्यू संस्थेच्या सर्पमित्रांनी केले व त्याची तळोदी बाळापुर वनविभाग मध्ये नोंद करून त्याच्या अधिवासात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. यावेळेस स्वाब नेचर केअर संस्था चे सर्पमित्र यश कायरकर, महेश बोरकर, जिवेश सयाम, वनरक्षक एस.एस. गौरकर, वनरक्षक एस. बी. पेंदाम हे उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!