Homeचंद्रपूरकैद्याची पोलीस शिपायास झाडूने मारहाण चंद्रपूर वैद्यकीय रुग्णालयातील प्रकार...

कैद्याची पोलीस शिपायास झाडूने मारहाण चंद्रपूर वैद्यकीय रुग्णालयातील प्रकार…

चंद्रपूर : मानसिक रुग्ण असलेल्या एका कैद्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी नेणाऱ्या पोलिस शिपायास त्या कैद्याने झाडूने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो व्हिडिओ मागील आठवड्यातील असल्याचे बोलले जात आहे. तसेच तो पोलिस शिपाई मद्य प्राशन करून होता, अशी चर्चा आहे.

चंद्रपूर जिल्हा कारागृहात मागील अनेक महिन्यांपासून एक मानसिक रुग्ण असलेला कैदी आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडल्यानंतर तो विचित्र वागतो. या कैद्याची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पोलिस कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेले. मात्र, ज्या पोलिस शिपायाने त्याला रुग्णालयात नेले तो पोलिस शिपाई स्वतः दारूच्या नशेत धुत होता. दरम्यान, कैद्याचे अचानक मानसिक संतुलन बिघडले. त्याने रुग्णालयामध्ये पडलेला झाडू उचलला आणि डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसमोर पोलिस शिपायास मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथील कर्मचाऱ्यांनी मध्यस्ती करून त्याला सोडवले. मारहाण सुरू असताना एकाने या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. आता हा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे.

मी मागील काही दिवसांपासून सुट्ट्यांवर आहे. तसेच तो व्हिडिओ बघितला नाही. त्यामुळे ही घटना खरी आहे की खोटी याबाबत सांगू शकत नाही. परंतु, चार ते पाच दिवसांपूर्वी एका मानसिक संतुलन बिघडलेल्या कैद्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांसाठी नेले होते. बी बाब खरी आहे.
– वैभव आगे, कारागृह अधीक्षक, चंद्रपूर.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!