Homeचंद्रपूरबनावट सोने तारण ठेवून इसाफ स्मॅाल फायनान्स बँकेला लाखोंनी फसविले तीन कर्जधारकांविरुध्द...

बनावट सोने तारण ठेवून इसाफ स्मॅाल फायनान्स बँकेला लाखोंनी फसविले तीन कर्जधारकांविरुध्द गुन्हा दाखल

वरोरा: वरोरा शहरातील रत्नमाला चौकजवळ असलेल्या इसाफ स्मॉल फायनान्स बँकेमध्ये बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून ५४ लाख ४९ हजार रुपयाच्या कर्जाची उचल करण्यात आली. बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर बँक व्यवस्थापकाने वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलीसांनी तीन कर्जधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर- चंद्रपूर मार्गावरील रत्नमाला चौकाजवळ इसाफ स्मॉल फायनान्स बँक आहे. या बँकेमध्ये ९ मार्च ते ८ मे २०२३ या कालावधीत दहा वेगवेगळ्या सोने तारण कर्ज योजनेत भूषण ज्ञानेश्वर झिले, संदीप गंधारे, नरेश दुधगवळी यांनी सोन्याचे दागिने ठेवून ५४ लाख ४९ हजार रुपयांच्या कर्जाची उचल केली. त्यानंतर बँकेच्या ऑडिटमध्ये तारण ठेवलेल्या सर्व सोन्याच्या दागिन्यावर सोन्याचा मुलांमा चढवल्याचे दिसून आले.
त्यामुळे ते सोने बनावटी असल्याचे निष्पन्न होताच बँक व्यवस्थापकाने वरोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून तिनही आरोपींविरुद्ध कलम ४१७, ४२०, ४६७, ४६८, १२० ब कलमान्वने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेत बनावट सोन्याचे दागिने ठेवून एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल केल्याची ही घटना वरोरा परिसरात पहिल्यांदाच घडली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पंकज बोंडशे करीत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!